साहित्य संमेलनातील गैरहजेरीबद्दल  नारळीकरांनी व्यक्त केली दिलगिरी; मी सर्व प्रकारची तयारी केली होती, पण…

जयंत नारळीकर म्हणाले की, नाशिकचे साहित्य संमेलन लक्षवेधी झाले. ते मी दृकमाध्यमाव्दारे पाहिले. या संमेलनाला येण्यासाठी मी सर्व प्रकारची तयारी केली होती. संमेलानाआधी माझे अध्यक्षीय भाषण संयोजन समितीकडे पाठविले होते. मात्र...

साहित्य संमेलनातील गैरहजेरीबद्दल  नारळीकरांनी व्यक्त केली दिलगिरी; मी सर्व प्रकारची तयारी केली होती, पण...
साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि समन्वयकांनी जयंत नारळीकर यांंना घरी जाऊन सन्मानचिन्ह दिले.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 1:59 PM

नाशिकः नाशिक (Nashik) येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Sahitya Sammelan) अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar) गैरहजर होते. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. नारळीकरांची साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि समन्यवयकांनी भेट घेतली. त्यांना संमेलनाचे सन्माचिन्ह दिले. यावेळी नारळीकरांनी भावुक होत समाधान व्यक्त केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नारळीकरांच्या गैरहजेरीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 93 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनापूर्वी प्रकृती बिघडली. ते व्हीलचेअरवर बसून संमेलनाला आले. तशा स्थितीत पन्नासेक मिनिटे आमच्या सोबत घालवली. आता 94 व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचीही तब्येत ठिक नाही. त्यामुळे त्यांना उपस्थित राहिता आले नाही. खरे तर साहित्य महामंडळाने अध्यक्ष निवडीसाठी घटना दुरुस्ती केली. आता पुन्हा एकदा आम्हाला घटना दुरुस्ती करावे लागते काय किंवा यापुढे आम्हाला चालता-फिरता अध्यक्ष निवडायला हवा, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे याप्रकरणाची चांगलीच चर्चाही झाली. मात्र, नारळीकरांनी या गैरहजेरीबद्दल नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले नारळीकर?

जयंत नारळीकर म्हणाले की, नाशिकचे साहित्य संमेलन लक्षवेधी झाले. ते मी दृकमाध्यमाव्दारे पाहिले. या संमेलनाला येण्यासाठी मी सर्व प्रकारची तयारी केली होती. संमेलानाआधी माझे अध्यक्षीय भाषण संयोजन समितीकडे पाठविले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्य आणि वातावरणातील बदलामुळे संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल साहित्य रसिकांप्रति दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. संमेलनातील विषयात वैविध्य होते. विविध विषयाचे तज्ञ संमेलनात उपस्थित होते. नव माध्यमांचा संयोजकांनी चांगला उपयोग केल्याने संमेलन लोकांपर्यंत पोहचले असे ही त्यांनी स्पष्ट केले.

सन्मान चिन्हावर विज्ञान

साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक समीर भुजबळ, संमेलनाचे कार्यवाह नाटककार भगवान हिरे, सहकार्यवाह किरण समेळ, स्वागत मंडळाच्या सभासद शेफाली भुजबळ, चित्रकार राजेश सावंत, समाधान जेजुरकर यांनी पुण्यात डॉ. जयंत नारळीकर यांची भेट घेऊन संमेलनाचे सन्मानचिन्ह भेट दिले. संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. नारळीकर यांनी सन्मान चिन्हावर विज्ञान अवतरल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. आपण हे चिन्ह स्वत:च्या निवासस्थानी न ठेवता ‘आयुका’मध्ये ठेवणार आहोत. कारण त्यानिमित्ताने तेथे येणारे शास्त्रज्ञ विज्ञान प्रेमी यांना साहित्य व विज्ञान यांचा अनुबंध लक्षात येईल. यावेळी चित्रकार राजेश सावंत यांनी काढलेल्या संमेलनाध्यक्षाच्या व्यक्तीचित्राचे विशेष कौतुक केले.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.