अतिशय कर्तृत्ववान माणूस…, अजितदादांच्या निधनावर संभाजी भिडे यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे, दरम्यान अजित पवार यांच्या निधनावर संभाजी भीडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

अतिशय कर्तृत्ववान माणूस..., अजितदादांच्या निधनावर संभाजी भिडे यांची पहिली प्रतिक्रिया
अजितदादांच्या विमान अपघातावर संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 8:41 PM

अजित पवार यांच्या विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे, या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार हे मुंबईवरून विमानानं बारामतीला निघाले होते. त्यांच्यासोबत अन्य चार जण होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच थेट जमिनीवर धडकलं, विमान जमिनीवर धडकल्यानंतर मोठा स्फोटा झाल, आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे, कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, नेते देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांना राज्यभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे, दरम्यान अजित पवार यांच्या निधनावर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, समर्थपणाने नेतृत्व करणारा, कर्तृत्ववान माणूस आपल्यातून निघून गेला, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे? 

अतिशय कर्तृत्ववान असा माणूस आपल्यातून निघून गेला,अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अजितदादा यांच्या निधनावर दिली आहे, समर्थपणाने नेतृत्व करणारी व्यक्ती निघून गेली, त्यामुळे अत्यंत दुःख होत आहे, अशी भावना देखील संभाजी भिडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

पुण्यात उद्या बंद 

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे, अजित पवार यांची राजकारण आणि प्रशासनावर जबरदस्त पकड होती. संपूर्ण राज्यातच त्यांना माणनारा मोठा वर्ग होता. मात्र पुण्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे आता उद्या पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तेथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. उद्या पुण्यातील सर्व दुकाने बंद असणार आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील बारामतीमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे.