
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 9 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता आरोपींना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर आज उर्वरीत युक्तीवाद होणार आहे. या सुनावणीला धनंजय देशमुख आणि कुटुंबिय हजर आहेत. धनंजय देशमुख यांनी सुनावणीपूर्वी मोठा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आम्हाला न्यायाची अपेक्षा
आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराड यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे शुक्रवारी ही सुनावणी अर्धवट राहिली होती आज ही सुनावणी पूर्ण होईल असे वाटते या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही न्यायालयात पोहोचले आहेत.
आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही न्यायव्यतिरिक्त काही बोललेलो नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आरोपी नंबर एकने हायकोर्टात 12 तारखेला बेल एप्लीकेशन दाखल केले होते. त्यासंदर्भात आर्ग्युमेंटचा काही भाग आज कोर्टात होणार आहे. आरोपीचे राज आश्रय घेतलेले समर्थक हे न्यायालय, एसआयटी, मुख्यमंत्री, सीआयडी यांना चॅलेंज करत आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
आरोपींची हत्तीवरून मिरवणूक काढणार
आर्ग्युमेंट होण्याअगोदर आरोपी बाहेर येणार, दहशत माजवणार, आमच्या कुटुंबाला भयभीत करण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आमच्यावर एवढे मोठे दुःख आणि आघात झालेला असताना आम्ही न्यायालय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलो आहोत. आमच्या सर्व गोष्टीवर अजूनही विश्वास आहे आणि आम्हाला अपेक्षा न्यायाची आहे, आमचा माणूस निष्पाप होता आणि न्यायालयाने न्यायालयाने न्याय केला पाहिजे
आरोपीचे समर्थक असे का करत आहेत, किंवा जे वावड्या उठवत आहेत, त्यावर मी आर्गुमेंट झाल्यावर बोलणार आहे. त्यांनी जी अराजकता माजवलेली होती ती खूप भयानक होती, त्यांना ना कुठल्या गोष्टीचे भय ना चिंता आहे, त्यांना वाटते आपण जे करतो तोच कायदा आहे आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे ते चुकीच्या वल्गना आणि व्हाट्सअप स्टेटस टाकत असतात, चुकीच्या पद्धतीचे इंस्टाग्राम वर रिलस टाकत असतात, आरोपीची हत्तीवर मिरवणूक काढायची अशा पोस्ट करत असल्याचा मोठा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात बीडचे पोलीस काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
परंतु आरोपीचे समर्थक असे कधीही करत नाही की एका निष्पाप माणसाला संपवले ज्याने संपवले त्याला शिक्षा झाली पाहिजे असे ते काही करत नाही. आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत आणि आम्हाला न्याय मिळेल. कोर्टामध्ये काय प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल मी बोलणार नाही ते वकील बोलत आहेत परंतु आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि असे कोणीही समजू नये देशमुख कुटुंब एकटा आहे देशमुख कुटुंबाला कुठेतरी भयभीत केला जाईल आणि असा कोणाचा गैरसमज असेल तर तो काढून टाकावा, असे धनंजय देशमुख म्हणाले.
कृष्णा आंधळे पोलिसांच्या संपर्कात
फरार आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असताना सुद्धा पोलिसांच्या जास्त संपर्कात होता असा मोठा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला आहे. 29 जुलैला जी मीटिंग झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आणि त्यावेळी जे पोलीस अधिकारी होते ते जरी ताब्यात घेतले तर कृष्णा आंधळे सापडल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही हा आरोपी शोधण्यासाठी आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही राज्यव्यापी बैठक घेण्याचा ठरवला आहे. आणि गावकरी तसं नियोजन करत आहेत या राज्यव्यापी बैठकीला सर्व सामान्य लोक असतील, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं.