AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jalil MIM: ‘काही राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता का?’ बुलडोझर कारवाईनंतर इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल यांची पाठराखण

MIM Imtiaz Jalil on Bulldozer Action: नाशिक येथील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक छळाप्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना दणका बसला. त्यांचे घर बुलडोझर कारवाईत पाडण्यात आले. त्यावर आज पत्रकार परिषद घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.

Imtiaz Jalil MIM: 'काही राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता का?' बुलडोझर कारवाईनंतर इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल यांची पाठराखण
इम्तियाज जलीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 13, 2026 | 11:32 AM
Share

MIM Imtiaz Jalil on Bulldozer Action: नाशकातील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगित छळप्रकरणात आज छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावात हायहोल्टेज ड्रामा समोर आला. याप्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना मोठा झटका बसला. त्यांचे नारेगावातील घर आज बुलडोजर कारवाई करून पाडण्यात आले. त्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा संताप व्यक्त केला. त्यांनी यावेळी महापालिकेवर आरोप केले. तर मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली.

राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता का?

“मी मतीन यांच्या कुटुंबांचे अभिनंदन करतो. त्यांनी महापालिका अधिकारी आणि पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. या देशात आज जे सुरू आहे. या राज्यात जे सुरू आहे. त्याचा आम्ही सुरुवातीपासून निषेध करत आहेत. एखाद्या व्यक्तीवर आरोप होतो आणि काही संघटना, पक्षाचे नेते त्यांना दोषी ठरवतात. महापालिकेला प्रश्न विचारायला हवा की या शहरात केवळ एकच घर आहे का, जे अवैध आहे. बेकायदेशीर आहे. जर ते बेकायदेशीर असेल तर त्याबद्दल दुमत नाही. पण तुमच्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी अशा ज्या कारवाई करण्यात येत आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या निवड्याप्रमाणे मतीन पटेल यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे 15 दिवसांची मुदत मागितली होती. कोणतेही घर पाडण्याअगोदर 15 दिवसांची नोटीस द्या अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. खुलासा आल्यानंतर जी कारवाई करायची ती करा. पण महापालिका आणि सरकारी वकीलांना हे मान्य नव्हते. सुनावणी होऊन 24 तासही उलटले नाहीत. काय इतकी घाई होती घर पाडण्याची? भल्या पहाटे 4 वाजता पोलीस, अधिकारी यांना नारेगावमध्ये पाचारण करण्यात आले. सकाळी 6 वाजता हे घर पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता का? हे घर राष्ट्रासाठी धोकादायक होतं का?” असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला.

आम्ही अलिशान घर बांधून देऊ

मतीन यांच्या घरावर दुपारी 12 वाजता महापालिकेने नोटीस चिटकवली आणि 24 तासांच्या आत कारवाई केली. मी नारेगावला गेलो. त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांच्या परिसरातील लोकांना भेटलो. मी सर्वांना एकच गोष्ट सांगितली की मतीनवर अजून आरोप सिद्ध झालेले नाही. राजकीय पक्षाचे नेते आरोप सिद्ध करणार नाहीत. संघटना आणि मीडिया असे मिळून एका व्यक्तीवर आरोप करतात, त्याला दोषी ठरवतात, हे दुर्दैवी आहे. यामध्ये मतीनच्या आई-वडिलांची, त्याच्या पत्नी आणि मुलाची काय चूक आहे, असा सवाल जलील यांनी विचारला. ज्या माणसाचं घर तुम्ही पडलय,, त्याला आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेलं नाही. आम्ही त्याचं घर पुन्हा अलिशान बांधून देणार. प्रत्यकेाकडून लोकवर्गणी जमा करणार. आम्ही आमचे योगदान देणार. जलील यांनी पुन्हा मतीन पटेल यांची पाठराखण केली.

पालकमंत्र्यांना काडीची किंमत देत नाही

मी जर बोललो की, मंत्री संजय शिरसाट आणि भोंदू अशोक खरात नातेवाईक आहे तर ते मला सिद्ध करून दाखवावं लागेल. संजय सिरसाट काही न्यायालय आहे का. मी शिरसाट यांच्या आरोपांना काडी मात्र महत्व देत नाही. त्यांनी सिद्ध करावं की निदा खान ही माझी नातेवाईक आहे. त्यांना नाहीतर मी कोर्टात खेचणार आहे. असे चोर भामटे लोक माझ्या शहराचे पालकमंत्री असेल तर त्यांची इज्जत करणार नाही असे जलील म्हणाले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?