AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार मदत करायला गेले, पण नागरिकांनी पेट्या पळवल्या, संभाजीनगरमधला अजब प्रकार

आपण म्हणतो सरकारने, लोकप्रतिनिधींनी मदत करावी. पण मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी सहकार्य करणं देखील जरुरीचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अतिशय अजब प्रकार समोर आलाय. आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी करत पेट्या पळवल्या आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

आमदार मदत करायला गेले, पण नागरिकांनी पेट्या पळवल्या, संभाजीनगरमधला अजब प्रकार
| Updated on: Jan 11, 2024 | 3:30 PM
Share

दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर | 11 जानेवारी 2024 : सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि मदत हवी, असं आपण म्हणतो. त्यानुसार सरकार, लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांतून नागरिकांना खरंच मदत करण्याचा प्रयत्नदेखील करताना दिसतात. पण नागरिकांना त्या मदतीची जाणीव असायला हवी. तसेच ती मदत कुणाला दिली जातेय याचं भान असायला हवं. सर्वांना समान मदत मिळायला हवी ही भावना ठेवायला पाहिजे. कारण सर्वसमावेशक भावनेतून सर्वांपर्यंत मदत पोहोचू शकते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट, स्पोर्ट किट आणि कामगार किट वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण या कार्यक्रमात काही जणांनी प्रचंड गर्दी करत किटच्या पेट्या पळवत नेल्या. त्यांच्या पेट्या पळवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतोय.

गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर उपसा सिंचन योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार प्रशांत बंब यांच्याकडून किट वाटप करण्यात येत होतं. यावेळी मोठा गोंधळ उडाला. यावेळी पेट्या पळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पेट्या पळविण्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन कोलमडलं आहे. अनेकजण पेट्या पळवून नेण्यात यशस्वी ठरले आहेत.

जाळ्या तोडून पेट्या पळवल्या

गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट, स्पोर्ट किट, कामगार किट वाटपासाठी ठेवले होते. मात्र हे किट वाटप करत असताना गोंधळ उडाला. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीने सर्व पेट्या पळवायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे प्रशासनाकडून जाळ्या लावण्यात आल्या होत्या. पण त्या जाळ्या तोडून लोकांनी पेट्या पळवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे छोट्या पेट्यांचीदेखील लुटालुट करण्यात आली आहे. वेगवेगळे गाव आणि कामगारांना या पेट्यांचं वाटप केलं जाणार होतं. मात्र त्या गावच्या गावकऱ्यांना न मिळता दुसऱ्याच लोकांनी त्या पेट्या पळवून नेल्या आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.