AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरात ‘वंदे भारत’चे चाक तयार होणार; शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये तरुणांना मिळणार रोजगार

Shendra MIDC Vande Bharat : Bonatrans India wheelset plant या कंपनीत छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदे भारतचे पार्ट्स तयार करण्यात येणार आहे. शेंद्रा येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये वंदे भारत मुक्कामी असेल. त्यामाध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला नोकरी मिळणार आहे. तर अनेक रोजगार निर्मिती होईल.

छत्रपती संभाजीनगरात 'वंदे भारत'चे चाक तयार होणार; शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये तरुणांना मिळणार रोजगार
वंदे भारतचं चाकं तयार होणार
| Updated on: Sep 20, 2024 | 4:30 PM
Share

महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद झाले असले तरी रेल्वेचे जाळे दिवसागणिक विस्तारत आहे. अनेक नवनवीन रेल्वे ताफ्यात दाखल होत आहे. वंदे भारत ही ट्रेन सध्या लोकप्रिय ठरली आहे. लातूर येथे रेल्वे कोच कारखाना आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स तयार करण्याचे काम होणार आहे. पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीमध्ये याविषयीचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. Bonatrans India wheelset plant या कंपनीत त्याचा लवकरच श्रीगणेशा होईल. या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल.

शेंद्रयात 100 कोटींचे गुंतवणूक

शेंद्रा एमआयडीसीमध्ये वंदे भारत ट्रेनचे पार्टस तयार करण्याचे काम करण्यात येईल. ज्युपिटर वॅगन्स (JWL) च्या सहकार्याने तात्राव्यागोंका (Tatravagonka) यांची ज्युपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी Bonatrans India wheelset plant या  नावाने हा प्रकल्प सुरू करत आहे. याप्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असेल. त्यामाध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. तर पुरक उद्योगांना फायदा होईल. त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती होईल.

वंदे भारतचे चाक फिरणार

वंदे भारतसह इतर ट्रेनच्या चाकांची निर्मिती या प्रकल्पात करण्यात येईल. भारतात ही कंपनी पहिल्यांदाच स्थानिक बाजारपेठ आणि परदेशासाठी व्हीलसेट तयार करणार आहे. या प्रकल्पात महिन्याकाठी 1 हजार इतके व्हील सेट तयार करण्याची क्षमता आहे. येत्या दोन वर्षात या प्रकल्पातून महिन्याकाठी 5 हजार व्हील सेट तयार करण्यात येणार आहे. भारतात रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. तर जगातून ही रेल्वे चाकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून ही मागणी पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.  लातूरनंतर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला एक मोठा उद्योग आल्याने उद्योगांना चालना मिळणार आहे. विरोधक राज्यातून उद्योग पळवले जात असल्याची ओरड करत असताना आता ही अपडेट समोर आली आहे.  आता या प्रकल्पातून वंदे भारतसाठी कधी उत्पादन बाहेर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.