AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी कोचिंग क्लासेस म्हणजे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत; ग्राहक आयोगाने क्लासला असे शिकवले ‘फिजिक्स’

Consumer Forum : सध्या सगळीकडे क्लासचे पेव फुटले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने खासगी कोचिंग क्लासचे चांगलेच कान टोचले. न शिकवलेल्या कालावधीची फी व्याजासह परत करण्याचे ग्राहक आयोगाने आदेश दिले.

खासगी कोचिंग क्लासेस म्हणजे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत; ग्राहक आयोगाने क्लासला असे शिकवले 'फिजिक्स'
ग्राहक आयोगाचा शिकवणी वर्गाला दणका
| Updated on: Aug 15, 2024 | 3:17 PM
Share

सध्या सगळीकडे खासगी क्लासचे पेव फुटले आहेत. विद्यार्थी,पालकांचा शाळेपेक्षा क्लासवर अधिक विश्वास असल्याचे सार्वजनिक चित्र आहे. त्यातच क्लास चालक मनमानी करतात. अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करतात. अनेकदा क्लासच्या नावाखाली लूट होते. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने खासगी कोचिंग क्लासचे चांगलेच कान टोचले. काय आहे हे प्रकरण, असा मिळाला विद्यार्थ्याला न्याय.

शुल्क व्याजासह परत करा

खासगी कोचिंग क्लासेस हे अभ्यासक्रमाच्या सीट विकण्याची लिलावगृहे नाहीत. त्यामुळे सात आठवड्यानंतर फी परत न करण्याच्या अटी-शर्थी, दोन वर्षाचे शुल्क पहिल्या सहा महिन्यातच जमा करणे, ज्या कालावधीत शिकवले नाही, त्याचे शुल्क आकारणे, ही अनुचीत प्रथा असल्याचे निरीक्षण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नोंदवले. आयोगाने फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसला शुल्क व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस डोल्हारकर व सदस्य गणेशकुमार सेलूकर आणि जान्हवी ए भिडे यांनी हा निकाल दिला.

काय आहे प्रकरण

निकाल पत्रात नमूद केल्याप्रमाणे, आशिष घनश्याम वैष्णव यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा ओम याच्यासाठी त्यांनी फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता आकरावी आणि जेईईई या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. क्लासेसने त्यांना ९६ हजार रूपये शुल्क आकारले. क्लासेसने पहिल्या काही महिन्यातच त्यांच्याकडून ६३,७३९ रुपये फी जमा करुन घेतले. ओम याला सकाळची बॅच हवी असताना सुरुवातीचे काही दिवस सकाळच्या बॅचमध्ये बसवले पण नंतर मात्र त्याला संध्याकाळच्या बॅचमध्ये टाकण्यात आले.

जवळपास ६१ दिवस त्याने क्लास केला. संध्याकाळच्या बॅचमध्ये जमत नसल्याने त्याने क्लासेस बंद केले आणि त्याच्या पालकांनी क्लासेसकडे फी परत मागितली. ती त्यांनी दिली नाही म्हणून अ‍ॅड. जी के बोरुडे यांच्यामार्फत आशिष वैष्णव यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. भरलेली ६३,७३९ रुपये फी, मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च २० हजार रुपये अशी एकुण १ लाख १३ हजार ७३९ रुपये नुकसान भरपाई त्यांनी मागितली. क्लासेने पण बाजू मांडली. त्यानुसार विद्यार्थी हा ६१ दिवस क्लासला उपस्थित होता. त्याने वर्गाची वेळ बदलण्याची विनंती केलेली नव्हती. फी परत करण्याबाबत एक धोरण ठरवलेले आहे. त्यानुसार सात आठवडे उलटून गेल्यानंतर फी परत केली जात नाही. असे म्हणत फी परत करण्यास नकार दिला.

क्लासचे टोचले कान

कोचिंग क्लासेस या खासगी असल्या तरी त्या अभ्यासक्रमाच्या जागा विकण्याची लिलावकेंद्रे नाहीत. क्लासेसने फक्त आपल्या नफ्याचाच विचार केलेला आहे. शिक्षण क्षेत्रात असा विचार करता येत नाही. दोन वर्षाची फी आधीच वसूल करुन घेणे, फी परत करण्याबाबतच्या अयोग्य अटी-शर्थी तयार करणे, ६१ दिवसानंतर शिकवलेले नसताना त्याचीही फी घेणे हा सर्व प्रकार अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले.

येथे वाचा निकालपत्र : District Consumer Grievance Redressal Commissions Order

चार महिने शिकवले, त्याचे प्रतिमाह ४ हजार रुपये प्रमाणे १६ हजार रुपये वगळता बाकी ४७,७३९ रुपये ७ टक्के व्याजासह परत करावेत. तसेच मानसिक त्रासापोटी ५ हजार आणि तक्रारीचा खर्च ३ हजार असे एकूण ८ हजार रुपये भरपाई ४५ दिवसांत द्यावी. ती न दिल्यास त्यावर दोन टक्के व्याज आकारले जाईल, असा निकाल आयोगाने दिला.

Follow Us
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी