AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचा मुख्यमंत्री कसा ठरणार? मुख्यमंत्रीपदाचं सूत्रं काय?; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान समोर

Sanjay Shirsat on Mahayuti CM : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत असताना राज्याच्या प्रमुखपदी कोण असेल? याची चर्चा होतेय. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण? वाचा सविस्तर...

महायुतीचा मुख्यमंत्री कसा ठरणार? मुख्यमंत्रीपदाचं सूत्रं काय?; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान समोर
देवेंद्र फडवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: ANI
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 31, 2024 | 1:55 PM
Share

राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. आमचीच सत्ता येणार, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी हे कबूल केलं की महायुतीची सत्ता येणार मुख्यमंत्री कोण होणार. ते म्हणाले की महायुतीची सत्ता आल्यास भाजपचा मुख्यमंत्री होईल. पण यापेक्षा महायुतीची सत्ता येणार याला आम्ही महत्त्व देतो आणि मुख्यमंत्री निवडून आलेल्या संख्येनुसार ठरणार आहे. राज ठाकरे यांच्याकडे आम्ही पॉझिटिव्ह अँगलने पाहतो, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणालेत.

पक्ष अन् चिन्हावर भाष्य

राज ठाकरे यांचा पक्ष वेगळा त्यांचा झेंडा वेगळा आहे. त्यांनी त्यांची निशाणी कमावलेली आहे. आम्ही निशाणी ढापलेली नाही. आम्ही मुळात शिवसेना सोडलेलीच नाही. आमची शिवसेना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे. झेंडा आमच्याकडे आहे निशाणी आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही ढापण्याचा प्रश्नच येत नाही, असंही संजय शिरसाट म्हणालेत.

अमित ठाकरे काय बोलले त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका. त्यांची निवडणूक आहे जे जे होईल ते लढण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आम्हाला ना खंत आहे ना खेद आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. निवडणुकीमध्ये जे जे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे. चार तारखेनंतर कोण कोणाला पाठिंबा देते हे बघितलं पाहिजे आहे. माहीमच्या जागेबाबत सदा सरवणकरांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचं काम करावं लागेल. जो काही निर्णय होईल तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही बंधनकारक असेल, असं विधानही संजय शिरसाटांनी केलं आहे.

संजय राऊतांवर निशाणा

संजय राऊत यांचे फटाके विजल्यामुळे ते दुसऱ्यांच्या फटाक्याकडे पाहत आहेत. आता आवाज एवढा दणदणीत होईल की त्या आवाजाला संजय राऊतच्या कानठाळ्या बसणार आहेत. संजय राऊत हा घरफोड्या माणूस आहे. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जे केलं ते काय होतं दुसऱ्यांनी भाजपसोबत गेले की हा बोलतो. संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये गरज पडू शकतो किंवा पागल खाण्यामध्ये गरज पडू शकते, असं संजय शिरसाट म्हणालेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट