
उद्या राज्याच्या राजकारणात एक विशेष घटना घडत आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकाच मंचावर असतील. दोन्ही ठाकरे बंधु विजय मेळावा घेत आहेत. राज्यातील जुन्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या घडामोडीवर मत मांडले आहे. जेव्हापासून या हालचाली सुरू झाल्या तेव्हा पासून, उत्सहाचे वातावरण झाले आहे. जेव्हा दोन्ही नेत्यांची बैठक झाली. मेळाव्याचा हा निर्णय झाला, नंतर आम्ही सगळीकडे बोलायला सुरुवात केली, असे ते म्हणाले.
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे
राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा आम्हाला दुःख झाले, पण आता आनंद होत आहे की, ते दोघे एकत्र येत आहे. राज ठाकरे सोडून गेले तरी बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर प्रेम होते. दोन्ही भाऊ एकत्र आले तर, महाराष्ट्र मध्ये जो घाणेरडा प्रकार सुरू आहे, भ्रष्टाचार,गद्दाऱ्या तोडफोड सुरू आहे, त्याविरोधात आवाज उठेल. हा जो प्रकार सुरू आहे, तो लोकांना आवडला नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देत नाही पण आमदारांना भरपूर पैसे देता, ते लोकांना पटले नाही. आज मराठी माणसाला वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे. त्यावेळी या चिमण्यांनो परत या हे जे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ते आज पूर्ण होत असल्याचा दावा खैरेंनी केला.
नाऱ्या बिऱ्याला ज्या टीका करायच्या ते करु द्या
तुम्हाला वाटत असेल आज बाळासाहेब ठाकरे इथे नाहीत, पण साहेब आज इथे आहेत आणि ते लक्ष देतात. आजही उद्धव ठाकरे कोणता निर्णय घ्यायचा असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या रूममध्ये जाऊन दर्शन घेतात आणि त्यांच्याशी बोलतात, आणि जो काही निर्णय घ्यायचा, तो आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने घेतात, आणि मीही तसेच करतो, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
उद्या मुंबई मध्ये जबरदस्त वातावरण राहणार आहे, उद्या मनसे, शिवसेना आणि इतर मराठी जनता येणार आहे. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो त्यांनी चांगली भूमिका घेतली. मग नाऱ्या बिऱ्या ज्या टीका करतात ते करु द्या, शेवटी काही जरी झाले तरी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीसांना काय वाटते?
देवा भाऊ म्हणतात चहा प्या, समोसा घ्या, तुम्ही पनीर खा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही सेव्हिंग करा, हे देवेंद्र फडणवीस वरतून बोलतात, पण आतून त्यांना वाटते हे दोघे भाऊ एकत्र येऊ नये, आणि हे सर्व दुनियेला माहीत आहे. फडवणीस वरतून बोलतात, असा टोला खैरेंनी लगावला. पण काही टिन पाट लोक बोलतात असे होऊ शकत नाही, त्यांना वाटते हे दोघे एकत्र आले तर आपले काय होईल, आणि या भीतीने ते लोक बोलतात.उद्या आमचे नेते उद्धव ठाकरे आणि मी त्याठिकाणी त्यांच्या सोबत असणार आहोत आणि राज ठाकरे यांना पण अभिवादन करणार आहोत, दोघांना अभिवादन करू, असे खैरे म्हणाले. सुप्रीम कोर्टाची जी तारीख ठरलेली आहे, तो निर्णय द्यावा, धनंजय चंद्रचूड यांनी तर काहीच केले नाही, परंतु आता न्यायदेवतेने काही केले पाहिजे ही आमची मनोमन इच्छा आहे आणि अशी आपण जगदंबेला प्रार्थना करतो, असे मत खैरेंनी व्यक्त केले.