Sangali Crime News : उसनवारी फेडण्यासाठी विम्याचे पैसे मिळावे म्हणून मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून
Wife killed Her Husband for Insurance Money: सांगली जिल्ह्यात पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कर्ज फेडण्यासाठी विम्याचे पैसे मिळावे म्हणून पत्नीने मुलाच्याच मदतीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून समोर आली आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमत करून पत्नीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्याच्या तगाद्याला कंटाळून हे धक्कादायक कृत्य केल्याचं उघड झालं आहे. तपासात हा सर्व प्रकार अपघात म्हणून पोलिसांना भासवण्यात आला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने अधिक तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. बाबूराव दत्तात्रय पाटील असे या घटनेत खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर पत्नी वनिता बाबूराव पाटील, मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि त्याचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान अशी आरोपींची नावं आहेत.
बाबूराव दत्तात्रय पाटील यांनी घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज घेतले होते. तसंच काही माणसांकडून देखील हात उचल घेतलेली होती. हे कर्ज परत फेडण्यासाठी पैसे नसल्याने घेणेकरी तगादा लावत होते. त्यातच मयत बाबुराव पाटील यांच्या इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी पत्नी वनिता हिने मुलाच्या साथीने हा खुनाचा कट रचला. मात्र सुरुवातीला पोलिसांना नरसिंहगावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिरढोण येथील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे भासवले. पोलिसांना याबद्दल संशय आल्याने या घटनेचा तपास पुढे सुरू ठेवला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजसला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भिमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी या तिघांनी संगनमताने विम्याच्या पैशांसाठी हा खून केल्याचं कबूल केलं.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
