Sadabhau Khot : आजच्या जगातले मल्हारराव होळकर कोण असेल तर ते गोपीचंद पडळकर… सदाभाऊ खोत आणि पडळकरांमध्ये जुगलबंदी

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि जयकुमार गोरे यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. पडळकर यांच्या जत विकासाचे कौतुक, खोत यांच्या चतुराईवर गोरे यांचा चिमटा यांची कार्यक्रमात चर्चा रंगली.

Sadabhau Khot : आजच्या जगातले मल्हारराव होळकर कोण असेल तर ते गोपीचंद पडळकर... सदाभाऊ खोत आणि पडळकरांमध्ये जुगलबंदी
सदाभाऊ खोत- पडळकरांमध्ये रंगली जुगलबंदी
| Updated on: May 17, 2026 | 10:24 AM

सांगलीतील जतमधील एका कार्यक्रमात भाजपच्या तीन नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली होती. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि जयकुमार गोरे यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले. आजच्या जगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर .. असं सदाभाऊ खोत म्हणाले. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं दिसून आलं.

काय म्हणाले सदाभाऊ खोत ?

” जत तालुक्यामध्ये शंभर वर्षांमध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा दीड वर्षांमध्ये गोपीचंद पडळकर यांनी विकास केला. नगरपालिका निवडून आणली, पंचायत समिती निवडून आणली. म्हणजे मी तर म्हणतो, आजच्या युगातला, सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर आहे” असं सदाभाऊ खोत म्हणाले. “आता असं म्हटलं तर काही लोक टीका करायला लागणार, पण आम्हाला माहित आहे, कुठे बटन दाबायचं”, असंही खोत यांनी पुढे म्हटलं. तसेच यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही सदाभाऊ खोत यांच्याबद्दल बोलताना चिमटा काढला.

जतची वकिली करण्यासाठी सदाभाऊंना बोलावलं

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानानंतर गोपीचंद पडळकरांनी भाषण केलं, त्यावेळी ते सदाभाऊ खोत यांच्याबद्दल बोलले. ” सदाभाऊ यांना मी आमदार म्हणून बोलावलं नाही. माझे मित्र म्हणून बोलावलं नाही. तर जत तालुक्याची वकिली बिना पैशात करायची यासाठी त्यांना बोलावलं आहे”, असा चिमटा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ यांना चिमटा काढला. “तुम्ही फक्त जतचचं बोलायचं, तुम्ही स्वत:चं काही बोलायचं नाही”, असंही ते म्हणालेय

सदाभाऊ खोत हे चतुर आमदार – जयकुमार गोरे

‘सदाभाऊ खोत यांनी भाषणामध्ये मी एकदम साधा आहे, असं भासवायचा प्रयत्न केला. मी अत्यंत साधा आहे, जणू आपल्याला काहीच कळत नाही ,असं भासवण्याचा प्रयत्न नेहमीच सदाभाऊ करत असतात. पण खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल तर ते सदाभाऊ खोत आहेत”, असं जयकुमार गोरे म्हणाले. “आणि कुणाला कुठे दाबायचं, कुणाकडून कसं कायं आणायचं, आणि कितीही दिलं तरी माझं काही झालं नाही कसं म्हणायतं, कमीच आहे, असे म्हणायचं शिकायचं असेल तर सदाभाऊ खोत यांच्या कडून ट्रेनिंग घ्यावं”, असा चिमटाही मंत्री जयकुमार गोरे यांनी काढला.

Follow Us