AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dina Patil : कशाला माझ्या XXX मध्ये घुसताय? परत आला तर मारून टाकेन; संजय दिना पाटलांची मग्रुरी आणि मुजोरी, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी

खासदार संजय दिना पाटील पुन्हा वादात सापडले आहेत. शिवसेना शिंदे गटात नुकतेच गेलेल्या पाटील हे पत्रकारांशी बोलत असताना संतापले. त्यांनी पत्रकारांवर अरेरावी करत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची धमकीही दिली. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात नवा गदारोळ निर्माण झाला असून, आधीच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता ही घटना त्यांच्यासाठी नवीन अडचणी घेऊन आली आहे.

Sanjay Dina Patil :  कशाला माझ्या XXX मध्ये घुसताय? परत आला तर मारून टाकेन; संजय दिना पाटलांची मग्रुरी आणि मुजोरी, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी
संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ
| Updated on: Jun 25, 2026 | 2:39 PM
Share

आठवड्याभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी एक, खा. संजय दिना पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला, संजय राऊतांनी त्यावर लेटर बॉम्ब टाकला. संजय दिना पाटील याच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे देखील नाराज झाले. तेच संजय दिना पाटील आता पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र ते अगदीच चुकीच्या कारणामुळे. माध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटील हे भडकले, संतापले आणि रागाच्या भरात त्यांची जीभ चांगलीच घसरली. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर अरेरावी केली तसेच त्यांना शिवीगाळही केली. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटील यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकीही दिली.

पत्रकारांना मारण्याची धमकी

मुंबईत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊतांनी केलेले आरोप यावर त्यांनी उत्तर दिलं. शिंदे आपल्यावर नाराज नाही तर त्यांनी शाबासकी दिली असं सांगत संजय दिना पाटील हे विविध विषायंवर बोलले. मात्र बराच वेळ बोलून झाल्यावर ते निघत असताना एका पत्रकाराने त्यांना आणखी राजूल पाटील, नक्की कुठे यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. रागाच्या भरात बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी माध्यमांना शिवीगाळ करत थेट धमकी दिली.

माझं हे बघू नका तुम्ही, अती करताय. ए भाई बस ना,  बंद कर ना आता, बंद कर नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे तरतुम्ही काय आहे ते… अशा शब्दात संजय दीना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी शांततेची भूमिका स्वीकारत हो, हो असं म्हटलं, आम्ही चाललोय असं सांगितलं,  तरीही संजय दिना पाटील यांची मग्रुरी, त्यांचा माज कायम होता.

पुन्हा पुन्हा शिवीगाळ  

मी इज्जत करतो,  इज्जत करा सांगतोय परत XXXXXXXX… असं म्हणत त्यांनी पत्रकारांसमोरच शिव्यांची लाखोली वाहिली.  मी इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय तुम्हाला, जेवायला देतोय . काय, उगाच त्यांच्याकडे जाल. परत आला ना तर मारून पाठवणार तुम्हाला, जे बोलायचं, जे लिहायचं ते लिहा अशी थेट धमकीही  संजय दिना पाटील यांनी दिली.

एवढंच नव्हे तर, लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे…  कमिशनरकडे जाऊन कम्प्लेंट करा अशी मग्रुरीही त्यांनी दाखवली. इज्जत करतो, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला XXX घुसताय… अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती.. सागितलं ना सर्व… त्याने काही बोलू दे.. अरे काही बोलू दे.. तुझ्या XXXXX XXXX  गेलं  असं म्हणत, रेकॉर्ड करा आणि सांगा ,  तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार ..अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच रोष पसरला असून विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा