AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर एवढं मारलं असतं की हॉटेल चालवायच्या लायकीचेही राहिले नसते, संजय गायकवाड जलील यांच्यावर का संतापले?

संजय गायकवाड यांनी जलील यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे. वेटरला तर दोनच घुस्से मारले, तुम्हाला एवढं मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लाकीचे देखील राहणार नाहीत, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

तर एवढं मारलं असतं की हॉटेल चालवायच्या लायकीचेही राहिले नसते, संजय गायकवाड जलील यांच्यावर का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2025 | 2:52 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, असं जलील यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले गायकवाड? 

मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, अशी टिका एमआयएम माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती, जलील यांच्या या टीकेला आता गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा, या वेटरला तर दोनच घुसे मारले आहेत, तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही, असं आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मंगळवारी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला होता. शिळे आणि खराब जेवण दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

मी गेल्या साडेपाच वर्षांपासून मुंबईमध्ये येत आहे. मी जेवणासाठी बाहेर जात नाही. मी जेवण मागवलं पण डाळ खराब होती, भातही शिळा होता. मी पहिला घास खाल्ला आणि मला अस्वस्थ झालं.  यापूर्वी देखील तीनदा असाच प्रकार घडला होता, त्यावेळी मी कॅन्टीनच्या मालकाला समज दिली होती, असं स्पष्टीकर या संपूर्ण प्रकरणावर संजय गायकवाड यांनी दिलं होतं.

विरोधकांकडून टीका

दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे, त्यांच्या निलंबणाची देखील  मागणी करण्यात आली.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी