AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही जी जानसे…”, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल संजय राऊतांकडून पुन्हा सूचक विधान

संजय राऊत यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विधानानंतर, राऊत यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी कोणत्याही अटी-शर्ती नसल्याचे स्पष्ट केले आणि भाजप विरोध ही जनभावना असल्याचे सांगितले.

आम्ही जी जानसे..., ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल संजय राऊतांकडून पुन्हा सूचक विधान
Sanjay Raut raj thackeray uddhav thackeray
| Updated on: Apr 20, 2025 | 11:15 AM
Share

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असा पुर्नच्चार संजय राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे-ठाकरे गटाच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे त्यांचे मत मांडले. “जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरेंनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता. यामध्ये अटीशर्थी कुठे आल्या. कोणती अट, कोणती शर्त. जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही. यामताचा माझ्यासारखा माणूसही आहे. त्यात अट आणि शर्त आहे कुठे, कोणतीच नाही. एकही अट-शर्त कोणीही टाकलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी… प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. ही अट नाही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचे आहे आणि विशेषत: महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले.

“महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या”

“माझ्यासारख्या माणसाने गेले अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. राज ठाकरेंसोबत काम केलं. श्रीकांत ठाकरेंसोबत काम केलेला माणूस आहे. राज आणि उद्धव ठाकरेंसोबत एकत्र काम केलेले आहे. आता मी आदित्य ठाकरेंसोबत एकत्र काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे. मराठी माणसांचा स्वाभिमान, ज्या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. ते ध्येय काय होतं. महाराष्ट्र आणि मराठी माणूस, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती. आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून जर या संदर्भात काम करणारी लोकं एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे. यात उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट आणि शर्थ टाकलेली नाही. महाराष्ट्रात हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नका, यात कोणती अट आणि शर्थ आहे”, असा सवाल संजय राऊतांनी केला.

Follow Us
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...