AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाचा हा मंत्री 15 मिनिटात फुटणार, राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ, थेट नाव घेतलं!

आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. म्हणूनच बंडखोर खासदारांना संरक्षण दिलं. ते टायगर कसले. टायगर असे लपत असतात का. आम्ही टायगर आहोत. आता ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपाचा हा मंत्री 15 मिनिटात फुटणार, राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ, थेट नाव घेतलं!
devendra fadnavis and sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 3:47 PM
Share

Sanjay Raut Criticizes Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. ठाकरे गटाने आज (18 जून) आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरेंचे एकूण तीन खासदार उपस्थित होते. उर्वरित तीन खासदार अनुपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर आता सह खासदार बंडखोरी खरणार असल्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे ठाकरे यांच्या पक्षाने या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सध्याची स्थिती लक्षात घेऊन भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाची चांगलीच खिल्ली उडवली. ठाकरे यांच्याकडे राडा घालायलाही कोणी शिल्लक राहिलेले नाही, असे विधान महाजन यांनी केले आहे. महाजनांच्या याच विधानावर आता खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. अर्ध्या तासासाठी ईडी, सीबीआय बाजूला करा, राडा काय असतो ते दाखवून देऊ, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. म्हणूनच बंडखोर खासदारांना संरक्षण दिलं. ते टायगर कसले. टायगर असे लपत असतात का. आम्ही टायगर आहोत. आता ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे मला चीड आहे. माझा तो संताप आहे. तुम्हाला धीर नाही. शिवसेना तीच आहे. पण त्याकाळात लोकशाहीवादी शासन असायचे. रस्त्यावरच्या आंदोलनाला देशद्रोही ठरवत नव्हते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

तसेच, त्यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले?

गिरीश महाजन तुम्ही काँग्रेसमुळे स्वातंत्र्य भोगत आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिलं. देशासाठी त्याग केला. त्यांनी संपत्तीचा त्याग केला. त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ केली. तुम्ही काय केलं? असा सवालच संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना विचारला. गदर मुव्हमेंट आम्ही केली. तुमची गद्दार मुव्हमेंट आहे. पोलीस बाजूला सारून या. गिरीश महाजन तर १५ मिनिटात फुटतील, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच पाच मिनिट आमच्या हातात ईडी सीबीआय द्या. हे फुटतील. हे काय आम्हाला सांगत आहेत, अशी टाकीही राऊत यांनी केली.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर