AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘मी न बोललेले शब्द…’ राज ठाकरेंच्या त्या पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut : सामानाच्या फ्रंट पेजवर नितेश राणे यांच्या विभागाची जाहीरात आहे या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, "असू दे ना. सरकारी जाहीरात आहेत. मंत्री येतात आणि जातात. मेरीटाइम बोर्ड नारायण तातू राणे यांच्या नावावर नाहीय. मेरी टाइम बोर्ड सरकारच आहे. मी बरोबर म्हणतोय ना, ती सरकारची जाहीरात आहे. आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी, गद्दारांशी आहे. सरकारशी निपटून घेऊ"

Sanjay Raut : 'मी न बोललेले शब्द...' राज ठाकरेंच्या त्या पोस्टवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया
राज ठाकरेंबाबत काय म्हणाले संजय राऊत ?Image Credit source: social media
| Updated on: Jul 16, 2025 | 11:06 AM
Share

“निवडणुका न झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नेमलेले आहेत किंवा सरकारची निवडणूका घेण्याची इच्छा नसल्यामुळे. त्या महापालिकात स्थानिक स्वराज्य संस्थात सरकारी पैशाची जी लूट सुरु आहे. मुंबई महापालिका असेल, ठाणे असेल 70 हजाराचा कचऱ्याचा डब्ब मीरा-भाईंदरमध्ये घेतला जातो” असं संजय राऊत म्हणाले. “नगरचे शहरप्रमुख किरण काळे भेटले. अहिल्यानगर महापालिकेत गेल्या काही काळापासून प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे, त्या बद्दल किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाहीयत. नागरी सुविधा नाहीयत. 776 रस्त्यांच्या कामावर 350 कोटी खर्च झाले. तिथे रस्ते शोधावे लागातात. हे प्रत्येक महापालिकेत आहे. महापालिकेसंदर्भात तक्रारी कोणाकडे करायच्या? प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमताने अहिल्यानगरची महानगरपालिका ही एक दरोडेखोरीचा उत्तम नमुना आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाइल पाठवली” असं संजय राऊत म्हणाले.

“एका शहरात लोकांना रस्ते नाहीत, तो करणारे आमदार, नगरसेवक, माजी महापौर ते तुमच्या पक्षात आहेत. हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे. हा सुद्धा अर्बन नक्षलवाद आहे. लावा त्यांच्यावर तुमचे कायदे, विचारा प्रश्न त्यांना. राज्याच्या 27 महापालिकांमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरेंची मुलाखत ही एक आदर्श मुलाखत

उद्धव ठाकरेची मुलाखती घेतली आहे. त्यात ते म्हणतायत राज ठाकरे आपल्यासोबत आहेत. “का एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का?. जर एका मोठ्या भावाने लहान भावाविषयी मत व्यक्त केलं, राज ठाकरे माझ्यासोबत आहे. त्यात कोणी अस्वस्थ होण्याचं कारण नाही” असं संजय राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरे यांची मुलाखत पहावी, एक आदर्श मुलाखत आहे ती. अनेक विषयावर त्यांनी आपली मत स्पष्ट केली आहेत. ती मुलाखत पाहिल्यानंतर तुम्ही प्रश्न वचारा” असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंच्या पोस्टवर काय म्हणाले?

“राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारण्यापेक्षा महापालिका निवडणुकीनंतर काय होतं ते तुम्हाला दिसेल. राज ठाकरे यांची एक मी पोस्ट वाचली. ती वाचल्यावर त्यातले अर्थ आणि संदर्भ तुम्हाला कळायला हवे” असं संजय राऊत म्हणाले.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.