भारतीय युवक मंद झालाय… जय श्रीराम ! संजय राऊतांच्या त्या पोस्टवर संताप; भाजपने घेरलं
संजय राऊत यांनी भारतीय युवकांबद्दल केलेल्या विधानाने एकच मोठी खळबळ उडाली. त्यांनी थेट भारतीय युवकांना मंद म्हटले. आता भाजपाने संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतला. पोस्ट शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने मोठी खळबळ उडाली. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झाल्याचे म्हटले. त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर जोरदार टीका केली जात आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सर्व भारतीयांसाठी.. जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल, तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा…व्लादिमीर लेनिन पुढे त्यांनी कंसामध्ये लिहिले की, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय, जय श्रीराम.. संजय राऊत यांच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर भाजपाने जोरदार टीका केली. या पोस्टने नवीन वादाला तोंड फुटल्याचे बघायला मिळतंय. राऊतांनी थेट भारतीय युवकांना मंद म्हटले.
भारतीय युवकांना मंद संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर भाजपाच्या नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवनाथ बन यांनी म्हटले की, भारतीय युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं. लेनिनचे कोट सांगणाऱ्यांनी भारतीय युवकांचे कर्तृत्वही पाहावे. युवक भरकटलेले नाहीत; नैराश्याच्या राजकारणाला त्यांनी नाकारलं आहे.
सर्व भारतीयांसाठी:
“जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल, तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा.”
— व्लादिमीर लेनिन(सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय,
जय श्रीराम) pic.twitter.com/xAtY5NCVr2— Sanjay Raut (@rautsanjay61) May 14, 2026
जनाब संजय राऊतजी, लेनिनचे कोट शोधताना तुम्ही इतके गुंग झालात की भारतीय युवक काय करत आहेत हेच विसरलात. ज्यांना तुम्ही मंद म्हणता तेच युवक आज स्टार्टअप उभारतायत, चंद्रावर मोहिमा पाठवतायत,देश चालवतात,
सीमेवर उभे राहतात आणि मतदानातून तुमच्यासारख्या लोकांना वास्तवही दाखवतायत. खरं तर युवकांची विचार करण्याची क्षमता संपलेली नाही, फक्त दररोज सकाळी उठून नैराश्य विकणाऱ्या राजकारणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे.
जनाब संजय राऊतजी,
लेनिनचे कोट शोधताना तुम्ही इतके गुंग झालात की भारतीय युवक काय करत आहेत हेच विसरलात.
ज्यांना तुम्ही “मंद” म्हणता तेच युवक आज
स्टार्टअप उभारतायत,
चंद्रावर मोहिमा पाठवतायत,
देश चालवतात,
सीमेवर उभे राहतात,
आणि मतदानातून तुमच्यासारख्या लोकांना वास्तवही दाखवतायत.… https://t.co/nebAPiQyCB— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) May 15, 2026
आणि हो…जय श्रीराम लिहिल्यामुळे युवक भरकटले असे म्हणत असाल, तर भारतात रामाचा जयघोष हजारो वर्षांपासून आहे. तुम्ही मात्र अद्याप भरकटलेले आहात कारण तुम्हाला अजूनही मॉस्कोच्या सावलीत भारत दिसतो. संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राऊतांवर नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली. राज्यातील नेतेही यावर प्रतिक्रिया देऊ शकतात.