Eknath Shinde: तर बंडखोर नेत्यांची आमदारकी रद्द होईल, एकनाथ शिंदेंसाठी धोकादायक स्थिती, राऊतांच्या इशारावर जाणकारांचं मत वाचा

अजून आकडे मोजायला वेळ आहे. आता कशाला इतकी घाई करता. जे व्हायचं ते किंवा जे सिद्ध व्हायचं आहे ते सभागृहात समोर येईल.

Eknath Shinde: तर बंडखोर नेत्यांची आमदारकी रद्द होईल, एकनाथ शिंदेंसाठी धोकादायक स्थिती, राऊतांच्या इशारावर जाणकारांचं मत वाचा
संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:00 PM

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मित्र पक्षातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) आता डोके दुखी ठरत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आल्यासोबत 15 अधिक आमदार सुरतला नेले. तर आता ते थेट त्यांना नव्या जागी हलवण्याची तयारी केली जात आहे. या सर्वच्या सर्व बंडखोर आमदारांना आसामला हलविण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तडजोडीच्या मनसुब्यांवर आता पाणी फिरणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे ऑपरेशन लोटसमधून आता पाडले जाणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या बंडखोर आमदारांना मायेने बोलावतोय परत या, कारवाई ला सामोरे जाऊ नका असे म्हणत इशाराच दिला आहे.

राज्यात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकींचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा ठरला. यानंतर त्याच रात्री काही आमदार आपल्या बरोबर घेत शिंदे हे नॉटरिचेबल झाले. त्यानंतर यांचा शोध घेण्यात आल्यावर ते सर्व बंडखोर आमदार आणि शिंदे सुरतमध्ये असल्याचे कळाले. तसेच शिंदे यांनी आपल्या मागण्या समोर ठेवताना, भाजपशी युती करावी असे म्हटले होतं. त्यानंतर या बंडखोर आमदार समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र याला यश येताना दिसत नाही. याचदरम्यान बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले की, अजून आकडे मोजायला वेळ आहे. आता कशाला इतकी घाई करता. जे व्हायचं ते किंवा जे सिद्ध व्हायचं आहे ते सभागृहात समोर येईल. तर आपण आज आमदार आहात त्यामुळे ऐका. जर नाही ऐकला तर कारवाई होईल. आमदारकी जाईल. परत निवडणुकीला उभं रहावं लागेल. त्यामुळे आपलं अस्तित्व पणाला लागेल असं करू नका. परत या.

याच बरोबर राऊत म्हणाले, ज्यांना परत यायचं आहे त्यांनी यावं. मात्र येथे काही वेगळंच पहायला मिळत आहे. ज्यांना परत यायचं आहे त्याना पाठवलं जात नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलत आहोत. तोडगा निघेल. एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी प्रेमाने परत यावं. आम्ही त्यांचे स्वागत करू असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

किमान दोन तृतियांशहून अधिक सदस्यांचे पक्षांतर

आमदाराने पक्षाविरोधात बंडखोरी केल्यास त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच त्याची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र जर एखाद्या पक्षाच्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येपेक्षा दोन तृतियांशहून अधिक सदस्यांनी पक्षांतर केल्यास किंवा त्या सदस्यांनी वेगळा गट स्थापन केल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. सध्या शिवसेनेचे विधानसभेच ५५ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदें यांनी किमान दोन तृतियांशहून अधिक सदस्यांचे पक्षांतर करवून घेतल्यास त्यांचं सदस्यत्व कायम राहील.

पक्षांतरबंदीचा कायदा

तर एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतियांशपेक्षा कमी आमदारांचं समर्थन असेल तर त्यांच्यावर पक्षांतरबंदीचा कायदा लागू होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे असलेल्या समर्थक आमदारांकडे राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

पक्षांतर बंदी कायदा काय आहे?

1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्ती अन्वये पक्षांतरबंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. त्यानुसार यामध्ये 10वे परिशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले होते. त्यानुसार कलम 102 आणि 191 या आमदार, खासदारांना अपात्र ठरवणाऱ्या अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. या सर्व तरतुदींना पक्षांतरबंदी कायदा म्हणून ओळखला जातो.

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.