मोठी बातमी! संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

Sanjay Raut Health Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली आहे. त्यांना आता उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
Sanjay Raut Health
| Updated on: Nov 05, 2025 | 4:25 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली आहे. त्यांना आता उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती आणखी बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली

समोर आलेल्या माहितीनुसार, खराब प्रकृतीमुळे संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राऊतांची जारी केले होते पत्रक

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे माध्यमांपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली होती. या पत्रकात राऊत यांनी म्हटले होते की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच याहेर पडेन.

PM मोदींनी लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवीद असेच राहू द्या. संजय राऊत यांच्या या पत्रकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील विविध नेत्यांची त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणि ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.