Sanjay Raut : फक्त मोदींच्या नावाने भजन करुन आणि…संजय राऊत यांचं जळजळीत भाष्य

Sanjay Raut : "आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिर्चा झोंबतात. वातावरण खराब करतो, मोदींची बदनामी करतो असं बोलतात. मोदी स्वत:ची आणि देशाची बदनामी करतायत. प्रचाराला वेळ आहे ना, केरळ, आसाम, पश्चिमबंगाल इतक काही राज्यात"

Sanjay Raut : फक्त मोदींच्या नावाने भजन करुन आणि...संजय राऊत यांचं जळजळीत भाष्य
Sanjay Raut
| Updated on: Mar 16, 2026 | 10:45 AM

“माझं त्यांना एक आवाहन आहे खोट बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे पुढारी खोट बोलतायत. तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा की काय परिस्थिती आहे. एक महिना पुरेल इतकं इंधन आहे. गॅस टंचाई होणार नाही. इंधन टंचाई होणार नाही तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय. आखातातील सर्व तेल विहिरींना आगी लागल्या आहेत. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न झाला. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येतेय. माणसं मारायला ज्या माणसाला मजा येतेय. त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामिचा करार केला. इंधनाची टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात 40 टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडलाय. कामगार गावाकडे परतत आहेत. अनेक तीर्थ क्षेत्रात प्रसादाची कपात केली आहे हे मान्य केलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

“फक्त मोदींच्या नावाने भजन करुन आणि धार्मिक भावना निर्माण करुन इंधन तुटवडा, युद्ध संपणार नाही. एलपीजी गॅसच्या रांगा थांबणार नाहीत. हे भाजपने एकदा आत्मचिंतन करुन समजून घ्यावं. आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिर्चा झोंबतात. वातावरण खराब करतो, मोदींची बदनामी करतो असं बोलतात. मोदी स्वत:ची आणि देशाची बदनामी करतायत. प्रचाराला वेळ आहे ना, केरळ, आसाम, पश्चिमबंगाल इतक काही राज्यात. पण गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

फक्त तुम्ही मोदींच भजन करताय

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे. त्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलवून, गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं आहे. दोन्ही विधिमंडळात चर्चा केली पाहिजे. त्यासाठी दोन्ही विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे. तुम्ही ते काहीच करत नाही. फक्त तुम्ही मोदींच भजन करताय, काही नाही काही नाही. लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर, लोक हवालदिल झाले आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

‘गुजरातला माल उतरवला जाईल’

“पुढल्या दोन महिन्यांसाठी गुजरातला पुरेस तेल, गॅस उतरवला जाईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे जहाजं गुजरातला गेली की नाही?. गुजरातला माल उतरवला जाईल, मग उरलेला देश. देश मेला तरी चालेल. देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शाह गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे” अशा शब्दात राऊत यांनी टीका केली.

Follow Us