बहुमत चंचल, थोडा धीर धरा…मुंबई महापौरपदावर राऊतांचं सर्वात मोठं विधान; पडद्यामागे मोठ्या घडामोडी!

संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौरपदावर मोठं भाष्य केलं आहे. बहुमत हे चंचल असतं, असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार, असे विचारले जात आहे.

बहुमत चंचल, थोडा धीर धरा...मुंबई महापौरपदावर राऊतांचं सर्वात मोठं विधान; पडद्यामागे मोठ्या घडामोडी!
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 11:31 AM

BMC Election Result 2026 : राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता या सर्व पालिकांवर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुमतात आलेले पक्षांकडून महापौरपदाची निवड करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी बहुमत मिळवण्यास अपयशी ठरल्यामुळे सर्वात मोठा पक्ष अपक्ष तसेच इतर पक्षातील नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. आता महायुतीचा नेताच मुंबईचा महापौर होणार आहे. असे असतानाच आता आम्हालाही अडीच वर्षे महापौरपद द्या, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. महापौरपदावर बोलताना त्यांनी बहुमत फार चंचल असते, असे सांगत भविष्यात काहीही घडू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे या स्वत:ला भाई म्हणून…

राऊत आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना “स्वत:च्याच राज्यात नगरेवक लपवून ठेवायची वेळ असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे, हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिले आहे. राज्य त्यांचे आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांचे आहेत. राज्य त्यांचं, दादागिरी, गुंडगिरी त्यांची आहे. तरीही एकनाथ शिंदे या स्वत:ला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शाहाच्या माणसाला स्वत:चे नगरसेवक बंद करून ठेवण्याची वेळ आली आहे. म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाली आहे,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीलाच…

तसेच, अमित शाहा यांना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. शाहा यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाचा माणूस बसवायचा आहे. देवेंद्र फडणवीस मात्र याला मान्यता देणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांनी मुंबईचं महापौरपद भाजपाला दान केलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे शिंदे यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की मुंबईकरांनी भाजपाला मतदान केले आहे. असे असेल तर मग आमचे 76 नगरसेवक कुठून निवडून आले आहेत. बहुमत चंचल असते. थोडी वाट पाहिली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.