Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा.. ; सरपंच परिषदेचा सरकारला इशारा
Akhil Bhartiya Sarpanch Parishad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल 90 दिवसांच्या आत द्यावा, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरेल असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरकारला दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीने निकाल द्यावा, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरकारला दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. काल या प्रकरणातील अमानुष मारहाणीचे आणि हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या प्रकरणात त्यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी विरोधक करत आहे. अशातच आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा 90 दिवसांच्या आत लावावा अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायत सरपंच रस्त्यावर उतरलीत असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरकारला दिला आहे.