संतोष देशमुखांच्या आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांची आता खैर नाही, धनंजय देशमुखांनी केली मोठी मागणी
संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय आणि मुलगी वैष्णवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त देहदान व नेत्रदान करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी न्याय मिळावा यासाठी लढाई सुरू असल्याचे सांगितले.

बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी विविध खुलासे होत आहेत. सीआयडी आणि एसआयटीकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. आता या चौकशीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैष्णवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून लोकांकडून आम्हाला सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातूनच कुटुंब स्थिर करू शकलो, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
धनंजय देशमुखांकडून देहदान आणि नेत्रदान करण्याचा संकल्प
“धनजंय देशमुख यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी देहदान आणि नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी याबद्दलचा फॉर्मही भरुन दिला आहे. यापूर्वी माझा वाढदिवस सामाजिक उपकरणे साजरा करत होतो. मी माझ्या वाढदिवसानिमित्त माझा देहदान करणार आहे. आज मी अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे फॉर्म भरून दिला आहे. तसेच उद्या सकाळी दहा वाजता बारामती येथे मोर्चा आहे. या मोर्चाला मी, वैभवी आणि आमचे कुटुंब जात आहे. उद्या मी त्या मोर्चामध्ये आमच्या न्यायाची भूमिका मांडणार आहे”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
आरोपींना सहारा देणाऱ्यांची चार्जशीटमध्ये नाव आली पाहिजे
“आमच्यासाठी तो कालावधी दुःखाचा होता. महाराष्ट्रातील लोकांकडून आम्हाला सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातूनच आम्ही कुटुंब स्थिर करू शकलो. परंतु न्यायालयांची लढाई 50 टक्के पूर्ण झाली आहे. बाकी अजून राहिली आहे. ज्यांनी ज्यांनी या आरोपींना सहारा दिला होता, अशा लोकांचे नाव पुढच्या चार्जशीटमध्ये आली पाहिजे. ज्या पोलिसासोबत राहत होता त्यांची चौकशी आली पाहिजे. त्या पोलिसांनी दिलेल्या अभयामुळे निष्पा लोकांना भोगावं लागत आहे. संतोष देशमुख केस प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अजून आमच्याशी बोलणं झालं नाही. सायंकाळी बोलणं होईल”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.
सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करायचो
“खरंच या गोष्टीचा दुःख आहे ते आमच्यात नाही. हे आम्हाला कळले आहे की दुःखाचा डोंगर कसा असतो. ते असा कधीही विचार केला नव्हता. खूप दुःख होत आहे. पप्पांचा वाढदिवस असेल किंवा चाचा यांचा वाढदिवस असेल. धिंगाणा मस्ती न करता सामाजिक उपक्रम राबवून आम्ही तो करायचे”, असे वैभवी देशमुखने म्हटले.
