AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप करताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
| Updated on: Jan 08, 2025 | 3:27 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं  संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात आलं, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं, या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यात राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येते. मनोज जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? 

संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यात राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येते. सुरेश धस हे आता मनोज जरांगे यांची भाषा बोलत आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं. निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, धनंजय देशमुख यांनी सांगितले होते संतोष देशमुख यांची हत्या जातीयवादातून झाली नाही. सोळंके आणि क्षीरसागर यांचे घर जाळले त्यावेळी ओबीसी धावून आले होते. फडणवीस साहेब तुमच्याच पक्षाचा माणूस गृहविभागावर प्रश्न निर्माण करत आहे. ज्या वाल्मिक कराडचे फोटो धनंजय मुंडेंसोबत आहेत, त्यांचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांच्यासोबत देखील आहेत. निवडणूक जिंकायला तुम्हाला वाल्मिक आण्णा लागतो, तुम्ही जात बघून अधिकारी बाजूला काढत असाल तर आम्ही जात काढावी का? असा सवालही यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच या गंभीर घटनेचं लक्ष सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी कमी केलं, असा आरोपही यावेळी हाके यांनी केला.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना