आरोपींना पळण्यासाठी या लोकांनी केली मदत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांचा गंभीर आरोप

Santosh Deshmukh murder case: अधिकारी सांगतात आरोपी जंगलातून पळून गेले. परंतु आरोपी जंगलातून पळून गेले नाहीत. ते वाशी शहरातून गेले आहे. वाशी पोलीस ठाण्यामधील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली.

आरोपींना पळण्यासाठी या लोकांनी केली मदत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांचा गंभीर आरोप
| Updated on: Feb 23, 2025 | 5:32 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. त्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार सुरेश धस यांच्या प्रमाणे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करत आहेत. आता भाजप आमदार सुरेश धस यांनी
संतोष देशमुख खून प्रकरणात धाराशिव कनेक्शनचा उघड केले.

या पोलीस अधिकाऱ्यांनी केली मदत

धाराशिवमधील वाशीच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली. नितीन बिक्कड यातील आरोपी आहे. या सर्वांची चौकशी होऊन स्वतंत्र मकोका लावावा किंवा सहआरोपी करावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

भाजपाचे आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप करत मोठी मागणी केली. ते म्हणाले, अधिकारी सांगतात आरोपी जंगलातून पळून गेले. परंतु आरोपी जंगलातून पळून गेले नाहीत. ते वाशी शहरातून गेले आहे. वाशी पोलीस ठाण्यामधील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली.

मनोज जरांगेंवर म्हणाले…

मनोज जरांगे यांच्या नाराजीवर बोलण्यास सुरेश धस यांनी नकार दिला. ते म्हणाले, मनोज जरांगे माझे दैवत आहे. त्यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. कोल्हापूर येथे होणारे मराठा समाजाचे अधिवेशन हे जिल्हा पुरते आहे. त्यामुळे त्या अधिवेशातून मनोज जरांगे यांना डावले, असा त्याचा अर्थ कोण काढू नये, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांनी टीका केली होती. मनोज जरांगे म्हणाले होते की, तो माणूस कोमात गेला होता. त्यामुळे त्यांना शेवटचे बघणे गरजेचे होते ना? त्यांचा तो परिवार आहे आणि ती पारिवारिक भेट होती, असा टोला आमदार सुरेश धस यांना जरांगे पाटील यांनी लगावला होता. परंतु त्यावर बोलण्यास धस यांनी नकार दिला.