बोलघेवड्या स्वभावाने इन्फ्ल्यूएन्सर तान्या मित्तल अडचणीत, कोणी केली तक्रार ?

आपल्या बडबड्या आणि शेखी मारण्याच्या स्वभावाने इन्फ्ल्यूएन्सर तान्या मित्तल कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. तिच्या विरोधात ग्वाल्हैरमध्ये फसवणूकीची तक्रार दाखल झाली आहे.ग्वाल्हैरची बदनामी केल्याचा आरोप तिच्यावर लावला आहे.

बोलघेवड्या स्वभावाने इन्फ्ल्यूएन्सर तान्या मित्तल अडचणीत, कोणी केली तक्रार ?
Tanya mittal
| Updated on: Oct 15, 2025 | 8:39 PM

बिग बॉस सिझन – 19 मध्ये गाजलेली इन्फ्ल्यूएन्सर तान्या मित्तल खूप चर्चेत आली होती. ती नेहमी आपल्या श्रीमंतीच्या बढाया मारायची. आपण बकलावा खाण्यासाठी दुबईला जातो, बिस्कीट खाण्यासाठी लंडनला तर कॉफी प्यायला आग्र्याला जातो आणि आपले ग्वाल्हेरचे घर हे महल आहे. अशी स्वत:च्या तोंडून केलेल्या स्वत:च्या प्रसिद्धीमुळे तान्या प्रसिद्ध झाली परंतू याचा बडबड्या स्वभावाने ती अडचणीत आली आहे. तान्याच्या विरोधात ग्वाल्हेरची प्रतिष्ठा घालवणे आणि फसवणूकी संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

तान्याच्या विरोधात तक्रार

बडबड्या स्वभावासाठी प्रसिद्ध तान्या मित्तल हिच्या विरोधात ग्वाल्हैरचा आणखी एक इंफ्लुएंसर फैझान अन्सारी याने एसएसपी ऑफिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने तान्या खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

आपल्या तक्रारीत अन्सारी याने तान्या मित्तल हिच्यावर पैसे बुडवणे आणि रियालिटी शोत आपल्या कुटुंब आणि खाजगी जीवनासंदर्भात खोट्या अफवा पसरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तान्या हिने खोट्या कहाण्या सांगून लोकांमध्ये सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप अन्सारी याने केला आहे. तान्याने तिचा बॉयफ्रेंड बलराजला खोट्या केसमध्ये अडकवल्याने त्याला तुरुंगात जावे लागल्याचे अन्सारी याने म्हटले आहे.

तान्याच्या अटकेची मागणी

आपल्या लेखी तक्रारीत अन्सारी याने मागणी केली आहे की तान्या मित्तल हीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी आणि पोलिसांनी तिला लागलीच अटक करावी. ‘बिग बॉस 19’ मध्ये तान्याने तिच्या कुटुंबाबद्दल आणि खाजगी जीवनाबद्दल अनेक खोट्या कंड्या पिकवल्या आहेत. तिच्या दुकानाला तिने फॅक्टरी संबोधत आपले 4-5 बिझनेस असल्याचे खोटेच सांगितले आहे असे अन्सारी यांनी म्हटले आहे.

तान्याने बिग बॉसच्या घरात आपल्या श्रीमंतीचे खोटे दिखावे केले आणि थापा मारल्या. परंतू जेव्हा तिचे खरे सत्य बाहेर आले तेव्हा संपूर्ण देशासमोर ती हास्यास्पद ठरली आहे. फैझान अन्सारी याने तान्याच्या विरोधात आपण कोर्टात जाणार आहोत असे म्हटले आहे.

कोण आहे फैझान?

फैझान याने या आधी अनेक प्रसिद्ध व्यक्ती विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. याआधी त्याने पूनम पांडे, राखी सावंत, उर्फी जावेद, बिग बॉस विजेता एल्विश यादव आणि आसिफ मिराज यांसारख्या अनेक लोकांविरोधात कायदेशीर तक्रार केली आहे.

तान्याची पार्श्वभूमी

तान्या मित्तल ही पहिल्यांदा महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी चर्चेत आली होती. बिग बॉसमध्ये तिने सांगितले होते की ती कॉलेजमध्येच सोडून पुन्हा ग्वाहैरला गेली होती आणि आपला ऑनलाईन बिझनेस सुरु केला. तान्या दावा करते की ग्वाल्हैर मध्ये तिच्या अनेक फॅक्टरी आहेत. अनेक बिझनेस आहेत आणि ग्वाल्हैरचे घर फाईव्ह स्टार हॉटेलसारखे आहे.तान्या तिच्या याच सवयींमुळे शोमध्ये अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. तिला अनेक कॉमेडियनने टोमणेही मारले आहेत.