कराडमधील प्रीतीसंगमावर फिरायला आली होती, पोहण्याचा आवरला नाही मग…

| Updated on: Jun 09, 2023 | 11:09 AM

सांगलतील कुटुंब कराडमध्ये नातेवाईकांकडे आले होते. यावेळी सर्वजण प्रीतिसंगमावर फिरायला गेले होते. मात्र त्यांची ही पिकनिक मुलीच्या जीवावर बेतली आहे.

कराडमधील प्रीतीसंगमावर फिरायला आली होती, पोहण्याचा आवरला नाही मग...
कराडमध्ये नदीत मुलगी बुडाली
Image Credit source: TV9
Follow us on

कराड : कराडमधील प्रीतीसंगमावर कृष्णा कोयना नदीचा संगम झालेल्या ठिकाणी फिरायला आलेल्या एका मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शोध पथक आणि पोलीस घटनास्थळी रवाना झाले. दोन तास अथक प्रयत्न करुन मुलीचा मृतदेह शोधण्यास यश आले आहे. यानंतर मुलीचा मृतदेह कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याप्रकरणी रकाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सांगलीहून कराडमध्ये नातेवाईकांकडे आली होती मुलगी

सांगली येथील रहिवासी असलेली ही मुलगी कराडमधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. कराडमधील नातेवाईक, मुलगी आणि तिचे कुटुंबीय कराडमधील प्रीतीसंगम घाटावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी मुलींना पोहण्याचा मोह झाला. यासाठी एकूण चार मुली या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. मात्र थोडे अंतर नदीमध्ये गेल्यानंतर चारपैकी एका मुलीचा हात सुटला आणि ती मुलगी नदीपात्रामध्ये बुडाली.

दोन तासांनी मुलीचा मृतदेह शोधण्यात यश

नदीपात्रामध्ये बुडाल्यानंतर तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. साधारण दोन तास शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर या मुलीचा मृतदेह कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा