Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोक्या भोसलेच्या अडचणी संपता संपेना, वनविभाग घेणार मोठी ॲक्शन

बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करून भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक केली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधल्याचा आरोप आहे.

खोक्या भोसलेच्या अडचणी संपता संपेना, वनविभाग घेणार मोठी ॲक्शन
satish bhosale (2)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 3:16 PM

भाजप कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता खोक्या भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात वनविभाग मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे.

वनविभाग करणार मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या ग्लास हाऊसवर वन विभाग फिरवणार बुलडोझर फिरवणार आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेत घर बांधले आहे. याप्रकरणी वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वनविभाग हे अतिक्रमण काढणार आहे, असे म्हटलं जात आहे.

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण

वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश उर्फ खोक्या भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले आहे. गेल्या 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 3 आणि वनविभागाच्या वतीने 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सतीश भोसले विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून खोक्या भोसले हा फरार होता. सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले आज स्वतः पोलिसांना शरण जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रयागराजहून सतीश भोसले याला बीडकडे आणले जाणार आहे.

पोलीस आणि वनविभागाने खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली होती. या झाडाझडतीत खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आले होते. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं होतं.

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.