AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडच्या खासदार पुत्राला होणार अटक? थेट विलास घुले खून प्रकरणात पोलिसांनी..

Beed News : बीडमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. थेट खासदार आणि खासदार पुत्रावर गंभीर आरोप केली जात आहेत. थेट खून प्रकरणातील जबावात बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.

बीडच्या खासदार पुत्राला होणार अटक? थेट विलास घुले खून प्रकरणात पोलिसांनी..
Vilas Ghule case
| Updated on: Jun 25, 2026 | 12:50 PM
Share

बीडच्या केसमध्ये विलास घुले यांची हत्या करण्यात आली. भांडणे सोडवण्यासाठी गेल्यानंतर ही हत्या झाली. या हत्येत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाचे नाव पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. विलास घुले यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. हत्येच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी विलास घुले यांचे कुटुंबिय तब्बल 11 तास केस पोलिस स्टेशन बाहेर विलास घुले यांचा मृतदेह घेऊन आंदोलनाला बसले होते. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुले यांच्या नातेवाईकांसोबत रात्री उशीरा फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आरोपींवर कडक शासन होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विलास घुले यांच्या नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतली.

बीडमध्ये विलास घुले यांच्या हत्या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बघायला मिळाले. नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जबावात साैरभ बजरंग सोनवणे याच्या नावाचा समावेश केला. भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर विलास घुले यांच्यावर धारधार शस्त्राने वार झाले. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आले.

नातेवाईकांनी मुख्य सूत्रधार असलेल्या साैरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराविरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता. ज्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. केज तालुक्यात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर आता हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींवर उमेश माने या व्यक्तीच्या फिर्यादीवरून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश माने याचे आरोपींच्या नातेवाईकातील एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंधातून हा वाद सुरू झाला होता. उमेश माने याच्यासोबत सुरू असलेल्या वादात विलास घुले पडल्याने त्याची हत्या झाली. आता उमेश माने याने फिर्याद दिली असून अटकेत असलेल्या सर्व नऊ आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

खासदार बजरंग सोनवणे आमचे नातेवाईक आहेत, तुला जीवे मारल्यानंतर माझे कोणीच काही करू शकत नाही असे म्हणून आरोपी मारत होते असा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. विलास घुले हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदारांचे पुत्र सौरव सोनवणे आणि दुसऱ्या फिर्यादीत खासदारांचा उल्लेख आल्याने बीडचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!