कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनीच दिला आत्मदहनाचा इशारा, कुलगुरुंना धरले जात आहे जबाबदार

भूषण पाटील

भूषण पाटील | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Jan 31, 2022 | 2:54 PM

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातील सध्या विभागप्रमुख पदावर असलेल प्रा. जी. एस गोसावी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार आणि सेवेतील सेवाज्येष्ठतेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रा. जी. बी. कोळेकर आपली नियुक्ती होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे, मात्र डॉ. संजय चव्हाण यांनी आक्षेप घेतल्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनीच दिला आत्मदहनाचा इशारा, कुलगुरुंना धरले जात आहे जबाबदार
shivaji University kolhapur

कोल्हापूरः कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University) रसायनशास्र (Chemistry) विभागातील नियुक्तीचा (Promotion) मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्यामुळे हे प्रकरण आता कुलगुरूंकडे गेले आहे. या विभागातील दोन प्राध्यापकांनी विभागाच्या विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. रसायशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर डॉ. संजय चव्हाण यांच्या नियुक्तीचा मुद्दाही उचलून धरण्यात आला आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष आणि कास्ट्राईब संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील नियुक्तीचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आता कुलगुरू काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सेवेज्येष्ठतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विद्यापीठातील सध्या विभागप्रमुख पदावर असलेल प्रा. जी. एस गोसावी आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीनुसार आणि सेवेतील सेवाज्येष्ठतेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रा. जी. बी. कोळेकर आपली नियुक्ती होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे. सेवेज्येष्ठतेनुसार अधिविभागप्रमुख पद माझ्याकडे देण्याविषयी त्यांनी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांना मेलही केला आहे.
प्रा. जी. बी. कोळेकर यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या मेल मध्ये म्हणतात की, मला जर या पदावर नियुक्त केले नाही तर माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. या माझ्या मानसिक स्थितीला आपण जबाबदार असाल असा उल्लेख करून त्यांनी कुलगुरुंना रविवारी ईमेल केला आहे.

रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा

तर प्रा. डॉ. संजय चव्हाण यांच्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अधिविभागप्रमुख पदावरील नियुक्तीसाठी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन प्रा. डॉ. संजय चव्हाण यांची नियुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारी रिपब्लिकन पक्षाने कुलगुरूंना दिला आहे. तर प्रा. संजय चव्हाण यांची विभागप्रमुख पदी नियुक्ती करुन राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या आदेशाचे पालन करावे अशा मागणी शिवाजी विद्यापीठाच्या कास्ट्राईब महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंदराव खामकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

नितेश राणेंना आधी ताब्यात घ्या, सरकारी वकिलांची मागणी मान्य होणार?

VIDEO: ‘मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं…’; वाईन विक्रीविरोधात भाजप नेत्याची झिंगाट लावणी

अहो आश्चर्य!! कोट्यवधींच्या मूर्त्या चोरट्यांकडून साभार! विशेष पॅकिंगही केली, Nanded जवळच्या कंदकुर्ती गावातली घटना काय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI