VIDEO: ‘मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं…’; वाईन विक्रीविरोधात भाजप नेत्याची झिंगाट लावणी

महेंद्रकुमार मुधोळकर

महेंद्रकुमार मुधोळकर | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 1:16 PM

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुपर मॉल आणि किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून हा शेतकरी हिताचा निर्णय असल्याचं सांगत त्याचं समर्थनही केलं जात आहे.

VIDEO: 'मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं...'; वाईन विक्रीविरोधात भाजप नेत्याची झिंगाट लावणी
'मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं...'; वाईन विक्रीविरोधात भाजप नेत्याची लावणी

बीड: राज्यातील महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारने सुपर मॉल आणि किराणा दुकानातून वाईन (wine) विक्री करण्यास परवानगी दिली आहे. आघाडीच्या नेत्यांकडून हा शेतकरी हिताचा निर्णय असल्याचं सांगत त्याचं समर्थनही केलं जात आहे. तर, शेतकऱ्यांच्या मुलांना आणि तरुण पिढीला वाईन पिण्याचं प्रोत्साहन सरकार देत आहे का? असं सांगत भाजपने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्राला मद्य राष्ट्र करायचं आहे काय? असा खरमरीत सवाल ठाकरे सरकारला केला आहे. या निर्णयाविरोधात भाजप नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनेही केली आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी (ram kulkarni) यांनी तर या सरकारी धोरणावर टीका करणारी एक लावणीच लिहिली आहे. माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारू, बाई देव पावलाय गं… या प्रसिद्ध लावणीचं विडंबन करत मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू, काय देव पावलाय गं… अशी लावणीच कुलकर्णी यांनी सादर करून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एका व्हिडीओच्या द्वारे ही लावणी ऐकवली आहे. किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर मोठी टीका करण्यात येतेय. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी देखील वाईन विक्रीवर सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. कुलकर्णी यांनी थेट लावणी गीत गाऊन सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात तत्कालीन व्यवस्थेच्या आधारावर एक सुंदर लावणी तयार झाली होती. त्याचे बोल होते. ‘माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू, बाई देव पावलाय गं…’ आज वर्तमान व्यवस्थेत परिस्थिती बदलली नाही. मायबाप म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, त्या ठाकरे सरकारने राज्यातील तरुण मुलांना, शेतकऱ्यांना दारु प्यायला मिळावी म्हणून किराणा दुकानातून खुले आम दारुची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लावणी सुरू झाली आहे.

काय आहे लावणी?

आनंद झाला माझ्या मनाला, सोन्याचा दिसं आज आलाय गं,
मुख्यमंत्र्यानं… मुख्यमंत्र्यानं पाजलीया दारू न् काय देव पावलाय गं,
नाना पटोलेनं दिलीय दारू न् काय देव पावलाय गं,
पवार साहेबांनी पाजलीया दारु काय देव पावलाय गं !! धृ !!

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अशा प्रकारची लावणी या निर्णयामुळे तयार झाली असं आम्हाला वाटतंय, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. कुलकर्णी यांचा हा व्हिडिओ 1 मिनिटं 24 सेकंदाचा आहे. कुलकर्णी यांच्या लावणीचा हा व्हिडीओ आल्यानंतर तो हातोहात शेअर होत आहे. सोसश मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून यूजर्स हा व्हिडीओ वेगाने शेअर करत आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO: कोण ढोकळा विकतो ते सोडा, वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; सोमय्यांचं राऊतांना आव्हान

Gadchiroli Nagar Panchayat | एटापल्ली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?, दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश

बिग बॉसबद्दलचा अभिजीत बिचुकलेचा दावा खोटा ठरला, सलमान गांजा ओढतो म्हणत बिचुकले म्हणाला होता की…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI