Rohidas Patil Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन

Rohidas Patil Death : काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.

Rohidas Patil Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन
rohidas patil passed away
| Updated on: Sep 27, 2024 | 1:11 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज दुःखद निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून रोहिदास पाटील आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भुषवलं होतं. रोहिदास पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील यांचे वडील आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता. धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली.

कुठे होणार अंत्यसंस्कार?

उद्या सकाळी एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात रोहिदास पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.