मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना मोठा झटका? पक्षात वेगवान घडामोडी

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सर्व सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली आहेत, त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजी देखील समोर आली होती, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना मोठा झटका? पक्षात वेगवान घडामोडी
parth pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 9:31 AM

अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हाती आले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान एकीकडे या सर्व गोष्टी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद देखील याच काळात चव्हाट्यावर आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पक्षाची जी नवीन कार्यकारिणीची  यादी पाठवण्यात आली होती, त्या यांदीमध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव तर होतं, परंतु त्यांच्या नावासमोर कोणतंही पद लिहिण्यात आलं नव्हतं.

याच मुद्द्यावरून त्यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात होतं. तसेच प्रफुल पटले यांनी शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली, अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व पहायला मिळत आहे.

पार्थ पवार यांच्याकडून राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्ष पदावर पदाधिकारी निवड करण्यात आल्याननंतर, त्यांनी आता आपला मोर्चा मुंबई अध्यक्ष पदाकडे वळवला आहे.  लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदावर पार्थ पवार यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे.  आमदार झिशान सिद्धकी यांची लवकरच मुंबई अध्यक्ष पदावर निवड होण्याची शक्यता आहे.  समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर २ वर्षापासून राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे, या पदावर आता लवकरच आमदार झिशान सिद्धकी यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झिशान सिद्धकी हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान पार्थ पवार हे आता पक्षात चांगलेच सक्रिय झाले असून, पक्षातील पदाधिकारी निवडीवर त्यांचा प्रभाव पहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us