BREAKING - राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात (Beed NCP candidates ) बीडचे उमेदवार जाहीर केले आहेत.

BREAKING - राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, शरद पवारांकडून उमेदवार घोषित

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात (Beed NCP candidates ) बीडचे उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर शरद पवारांनी राष्ट्रवादीची पहिली यादी (Beed NCP candidates ) जाहीर केली.

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई-  विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड-  संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं.

शरद पवारांनी बीडचे उमेदवार जाहीर केल्याने आता बीड जिल्ह्यात रंगतदार लढती होणार आहेत. अन्य पक्षाच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास नात्यागोत्यातच लढती होण्याची चिन्हं आहेत.

बीडमधील रंगतदार लढती

  • बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
  • परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
  • गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
  • माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
  • केज – संगिता ठोंबरे (भाजप) VS नमिता मुंदडा (राष्ट्रवादी)
  • आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)

राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )
बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज – संगिता ठोंबरे (भाजप)
परळी – पंकजा मुंडे (भाजप)

संबंधित बातम्या  

बीड जिल्हा आढावा : यावेळी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *