सिरमचे संस्थापक मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण मी घेतली नाही कारण… : शरद पवार

शरद पवार यांनी सिरम कंपनीच्या संस्थापकांनी विनंती करुनही आपण कोरोना लस न घेतल्याचं सांगितलंय.

सिरमचे संस्थापक मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण मी घेतली नाही कारण... : शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 4:07 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी सिरम कंपनीच्या संस्थापकांनी विनंती करुनही आपण कोरोना लस न घेतल्याचं सांगितलं. तसेच यामागील कारणही नमूद केलं. ते म्हणाले, “मला सिरमच्या संस्थापकांनी कोरोना लस घेण्यास सांगितले, पण मी त्यांना आधी नगरला जाऊन येतो आणि तेथील परिस्थिती पाहून नंतर गरज वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो.” (Sharad Pawar comment why he not take Corona Vaccine on offer on Serum Founder)

शरद पवार म्हणाले, “सिरामला आग लागली मात्र सुदैवाने कोरोनाच्या औषधांना काही झाले नाही. सिरमचे संस्थापक माझे मित्र आहेत. ते काही दिवसांपूर्वी म्हणाले बीसीजीचे इंजक्शन घे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. आता पुन्हा गेलो होतो तर कोरोना लस घे म्हणाले. मात्र, मी सांगितले आधी नगरला जाऊन येतो तिथली परिस्थिती पाहतो, नंतर गरज वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो.”

“मोदींचं एक वाक्य मीही पाळत नाही आणि तुम्हीही नाही”

शरद पवार म्हणाले, “एके काळी अन्य ठिकाणी जावे लागत होते, तर 50 वर्षांपूर्वी फक्त श्रीरामपूर येथे हॉस्पिटल होते. आता अनेक हॉस्पिटल झाली आहेत. कोरोना काळात एक महिना घराबाहेर पडू नका असं सांगण्यात आलं होतं, तर नंतर ते वाढवण्यात आलं. त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली. ज्या काळात फार कुणी घराबाहेर पडत नव्हतं, तेव्हा मी राज्याचा दौरा केला आणि सर्व वैद्यकीय डॉक्टर एकत्र केले. तेव्हा मला खासगी डॉक्टर म्हणायचे फिरू नका, पण मी म्हणालो सर्व लोक अस्वस्थ आहेत.

“मोदींचं एक वाक्य आहे की ‘दो गज की दुरी’ मात्र मीही पाळत नाही आणि तुम्हीही पाळत नाही. असं असलं तरी आपण काळजी घेण्याची गरज आहे. आता इंग्लंडला पुन्हा 35 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलाय,” असं सांगत शरद पवार यांनी नागरिकांना संसर्गाच्या धोक्याची जाणीव करुन दिली.

हेही वाचा :

…आणि पवारांनी फेसबूकचा डीपी बदलला !

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं:शरद पवार

महाराष्ट्र, पंजाब ,तामिळनाडू कुठलाही शेतकरी असो , त्यांना सन्मानाची वागणूक द्या, रोहित पवारांचे केंद्राला खडे बोल

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment why he not take Corona Vaccine on offer on Serum Founder

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.