एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं:शरद पवार

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं:शरद पवार
शरद पवार

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. Sharad Pawar Madhukar Pichad

Yuvraj Jadhav

|

Jan 24, 2021 | 12:51 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, असं पवार म्हणाले. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत  आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला. (Sharad Pawar criticized Madhukar Pichad in Akole)

अगस्ती कारखान्याच्या कर्जाला शुक्राचार्य जबाबदार

राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळी जनतेच्या मनातल कळालं होते. जनतेला परिवर्तन हवं होते ते झालं आहे, असं शरद पवार म्हणाले. अकोले येथील येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर 200 कोटीच‌ कर्ज झाले, जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता दुसऱ्यांदा टीका केलीय. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी‌ सर्व ती मदत मी करतो, असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.

हसन मुश्रीफ यांना सल्ला

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना अकोले तालुक्यातील जनतेला आश्वासनं दिली आहेत. ती आश्वासनं पूर्ण करा, असा सल्ला शरद पवार यांनी हसन मुश्रीफांना दिला. ते पूर्ण करताना अडचणी आल्या तर मला सांगा, असंही पवार म्हणाले.

भंडारदरा मला आवडणारा परिसर

शरद पवार यांनी यावेळी बोलताना शरद पवारांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. भंडारदार हा मला आवडणारा परिसर आहे. सर्वात पहिल्यांदा 9 वीत शिकत असताना सायकलवर मी रंधाफॉल बघण्यासाठी लोणी ते भंडारदरा आलो होतो ही आठवण त्यांनी सांगितली. भंडारदरा आणि अकोले भागातील लोकांना दुर्लक्षित करू नका, असा सल्लादेखील शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, मात्र स्थानिक नागरिकांशी समन्वय असणे गरजेचे आहे. तालूका इको सेन्सेटिव्ह झोन झाला तर विकासाला अनेक मर्यादा येतील, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वैभव पिचड यांचा किरण लहामटे यांनी पराभव केला होता.

संबंधित बातम्या:

Special Story: ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे उजळलेत का?

झाडाचं पान का पडलं, या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, जयंत पाटलांचा टोला

(Sharad Pawar criticized Madhukar Pichad in Akole)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें