झाडाचं पान का पडलं, या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, जयंत पाटलांचा टोला

आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.  (Jayant Patil Criticizes BJP) 

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:43 PM, 23 Jan 2021
झाडाचं पान का पडलं, या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, जयंत पाटलांचा टोला
भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही.

मुंबई : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. झाडाचं पान का पडलं? या कारणामुळेही भाजप आंदोलन करु शकतं, असा टोलाही जयंत पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरुन लगावला. (Jayant Patil Criticizes BJP)

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आले होते. यानंतर भाजपने आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. मात्र मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी सर्व आरोप मागे घेतले. यावरुनच जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला.

त्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील, त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. त्यात पोलिसांनी काही निष्कर्ष काढला असेल आणि त्या महिलेने तक्रार मागे घेतली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. झाडावरील पानही पडले तरी ते पान का पडले यासाठी भाजपा आंदोलन करु शकते. पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

दरम्यान “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेऊ, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

“प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. भाजपला पराभूत करणं हे आमचं ध्येय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Criticizes BJP)

संबंधित बातम्या : 

प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार, राष्ट्रवादीची संवाद यात्रा, स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य