एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; 2 पॉवरफुल नेत्यांसह 11 नगरसेवकांना फोडलं, राजकीय समीकरण बदलणार

एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. 2 पॉवरफुल नेत्यांसह 11 नगरसेवकांची शिंदे गटात एन्ट्री झाली. त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; 2 पॉवरफुल नेत्यांसह 11 नगरसेवकांना फोडलं, राजकीय समीकरण बदलणार
sharad pawar and shinde
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 9:47 AM

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेत्यांना शिंदे गटात वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळमधील दोन माजी नगराध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. भुसावळमधील दोन पॉवरफुल नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यासहित 11 नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला.

भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश असल्याची राजकीय वर्तुळा चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 2025 मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. मात्र गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्याने गायत्री भंगाळे अपात्र झाल्या होत्या.

 

शरद पवार गटाच्या 11 नगरसेवकांची शिंदे गटात एन्ट्री

भुसावळ नगरपालिकेतील शरद पवार गटाच्या 11 नगरसवेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदेंनी सर्वांचं पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गायत्री भंगाळे, आणि अनिल चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी, सुनीता कृषधनकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यांच्यासहित सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान, आरिफ शेख आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेऊन शिंदे गटात प्रवेश केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us