अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार सहमत नाहीत, संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर नेमकं काय-काय म्हणाले?

"धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही", असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार सहमत नाहीत, संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर नेमकं काय-काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 6:20 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडलीय. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं किंवा स्वराज्य रक्षक म्हटलं तरी दोघं योग्यच आहे, असं रोखठोक मत शरद पवार यांनी मांडलंय. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या विधानावर शरद पवार यांची सहमती नाही हे स्पष्ट झालंय.

“धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे. त्याला ते मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्य रक्षक म्हणा, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. ज्याला जो उल्लेख करायचा तो उल्लेख करु शकतो”, असं शरद पवार म्हणाले.

“धर्मवीरबद्दल मला एक काळजी वाटते. मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा काही नेत्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एकेकाळचे सहकारी होते, त्यांचा उल्लेख ते अनेकदा करतात. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण त्यांचाही धर्मवीर असा उल्लेख केला जातो”, असंही शरद पवार म्हणाले.

“धर्मवीर असो किंवा संभाजी रक्षक असो, त्या व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दलची जी आस्था आहे, त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे, त्यासाठी वाद घालण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा, स्वराज्य रक्षक म्हणायचं असेल तर तसं म्हणा. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी केली”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. अजित पवार काय बोलले ते मी पाहिलं. त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला”, असं शरद पवारानी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.