Shashikant Shinde : सातारा SP च्या रजा वादावर शशिकांत शिंदे यांचं मोठं वक्तव्य, याचा अर्थ राज्य सरकारने..

Shashikant Shinde : "भाजप ओबीसी चेहरा आहे असं सांगत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळी परिस्थिती आहे. त्यांच्याकडे 3 ओबीसी चेहरे असताना देखील ते दिले नाहीत. त्यांनी केवळ ओबीसी समाजाचा वापर करून घेतला आहे. त्यांनी प्रिया शिंदे यांना दाखला दिला तो 2 दिवस आधी दिला आहे"

Shashikant Shinde : सातारा SP च्या रजा वादावर शशिकांत शिंदे यांचं मोठं वक्तव्य, याचा अर्थ राज्य सरकारने..
Shashikant Shinde
| Updated on: Mar 31, 2026 | 11:45 AM

“मला वाटतं की त्याचं नाव आलं असेल तर त्यांनी चौकशीला सामोर जाण गरजेच आहे. एसआयटीने बोलवल्यानंतर ट्रस्ट मध्ये असतील तर चौकशीला गेलं पाहिजे. नाव असेल तर एसआयटी कारवाई करेल. त्या संदर्भात टाळाटाळ केली जाते, अशा प्रकारची चर्चा होणं चुकीच आहे” असं शशिकांत शिंदे म्हणाले. ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टचे जे सीए आहेत पोपळे, ते आर्थिक व्यवहार पहायचे. त्यांच्या मालमता पुणे कोरेगाव पार्क येथे आहेत, रो हाऊसेस त्यांच्या नावावर आहेत. एवढी मोठी संपत्ती त्यांच्याकडे कुठून आली?

पत्रकारांच्या या प्रश्नावर शिशकांत शिंदे म्हणाले की, “मग हा विषय एसआयटी पुरता मर्यादीत राहत नाही. जर त्यामध्ये हवाला असेल तर वेगवेगळया प्रकारच्या यंत्रणा आल्या पाहिजेत. आयटी, ईडी आली पाहिजे. त्यांनी चौकशी करुन त्यामागे कोण-कोण आहे? हे शोधलं पाहिजे. चुकीच काही झालं असेल तर 100 टक्के कारवाई करणं गरजेच आहे”

सातारा एसपींच्या सक्तीच्या रजेवर काय म्हणाले?

सातार प्रकरणात एसीपीच्या सक्तीच्या रजेची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांची फसवणूक झाली असं म्हणायचं का? “मला सांगावसं वाटत की ज्या अर्थी एसपीना रजेवर पाठवलं याचा अर्थ तिथे चुकीच झालं हे अप्रत्यक्षपणे राज्य सरकारने कबलू केल्याचं दिसतं. नाहीतर ते रजेवर गेले नसते. रजेवर पाठवलं म्हणजे यंत्रणेचा गैरवपार केला हे सिद्ध झालं”

चुकीचं काही झालं असेल तर..

“आमची मागणी ही आहे की, ते अर्जित रजेवर गेले असतील तर ते चुकीचं आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे. सक्तीच्या रजेबद्दल बोलताना काल मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व गोष्टींच्या बाबतीत चौकशीत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून रजेवर पाठवलं आहे. आमची मागणी आहे की, चौकशी लवकरात लवकर करुन चुकीचं काही झालं असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे” असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

मग त्यांनी घटनेत बदल का केला?

“पक्षाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बैठका सुरू आहेत. सलग चार दिवस बैठका सुरू असतील. पक्ष बांधणी संघटना मजबूत करणे हे आमचं काम आहे. 7,8,9 तारखेला फ्रंटल सेलच्या बैठका सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून होणार आहेत. अल्पसंख्याक आणि ओबीसी सेल गायब केल्याचं समोर आलं आहे. पक्ष विभाजन झाल्यावर अजित पवार यांनी काळजी घेतली होती. भाजप सोबत जाऊन देखील शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार जपला होता. अजित पवार गेल्यानंतर घटनेत बदल करण म्हणजे भाजपच्या विचारधारेशी जवळीकता साधण्याचा प्रकार आहे. सुनेत्रा पवार ह्या प्रमुख आहेत अस ते सांगतात. मग त्यांनी घटनेत बदल का केला? त्यांचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना देण्याबाबत का निर्णय घेतला? पक्षाची बांधणी मजबूत झाली की शरद पवार देखील राज्यात दौरा करतील” असं शशिंकात शिंदे म्हणाले.

महेश शिंदे यांनी ब्लॅक मेल केलं

महेश शिंदे यांनी शिवसेना आणि भाजपला ब्लॅकमेल केलं. माझ्याकडे दोन मतं आहेत. मलाच अध्यक्ष पद द्या अशी मागणी केली. त्यांनी दोन पक्षांना वेठीस धरलं आहे असा आरोप शशिंकात शिंदे यांनी केला.

अंधश्रद्धा बील आम्ही मंजूर केलं

अंधश्रद्धा बील आम्ही मंजूर केलं आहे. महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री राज्यातील भोंदू बाबा नाशिक, आदर्श म्हात्रे प्रकरणावर बोलत नाहीत. हे त्यांना विचारलं पाहिजे

Follow Us