AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक, नेहरूंचा दाखला देत म्हणाले…

आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक, नेहरूंचा दाखला देत म्हणाले...
| Updated on: Feb 21, 2025 | 6:00 PM
Share

आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींनी जी  भुमिका घेतली ती महत्वाची आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यानंतर आता दिल्लीतील ७० वर्षानंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे.

नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला. मला गुरूस्थानी असलेले यशवंत राव चव्हाण उत्तम साहित्यिक होते, त्यामुळे मी सुद्धा उत्तम लिहिता झालो. इतकी संमेलनं झाली, माञ केवळ चार महिलांनाच संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. तारा भवाळकर यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नातं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात अनेक भगिनींनी भर घातली आहे.  साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते. राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे. सध्या संवाद कठीण आणि नाजूक परिस्थिती मधून जात आहे. त्यामुळे आता साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान