AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं यश, शरद पवार आता थेट मैदानात, केली मोठी घोषणा

राज्यात पाच विधान परिषद जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा झटका बसला, तीन जागांवर परभाव झाला, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठं यश, शरद पवार आता थेट मैदानात, केली मोठी घोषणा
SHARAD PAWAR Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 3:20 PM
Share

राज्यात पाच जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर अशा तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश होता. तर अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघ अशा दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. पाच जांगापैकी अवघ्या दोनच जगांवर विजय मिळवता आला. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठं यश मिळालं. तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. ज्यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला तर पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांचा विजय झाला. नागपूर मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय झाला.

तर दुसरीकडे महायुतीला या विधान परिषद निवडणुकीमध्ये दोनच जागा जिंकता आल्या. ज्यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय झाला. ते यापूर्वी देखील या मतदारसंघातून विद्यमान आमदार होते. तर पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला आली. दरम्यान या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. येत्या 3 किंवा 4 तारखेला शरद पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. दरम्यान यापूर्वी शरद पवार हे दोन नोव्हेंबरला दुष्काळी भागाचा दौरा करणार होते. परंतु त्यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुका असल्यामुळे ते येत्या तीन ते चार तारखेला दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. शरद पवार हे आधी अहिल्यानगरचा दौरा करणार आहेत, त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर जिल्हाचा देखील दौरा करणार आहेत. त्यानंतर ते राज्यातील इतर भागांना देखील भेट देणार आहेत. याबाबत खासदार निलेश लंके यांनी माहिती लिदी आहे. यंदा राज्यात पाऊसच न झाल्याने अनेक जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीर पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

Follow Us
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!