शरद पवारांची माढ्यातून माघार, पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढणार नाहीत. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र दगाफटक्याच्या भीतीने पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याचवेळी शरद पवारांनी नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पुण्यात पत्रकार परिषद […]

शरद पवारांची माढ्यातून माघार, पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढणार नाहीत. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र दगाफटक्याच्या भीतीने पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याचवेळी शरद पवारांनी नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी याबाबतची माहिती दिली.

“पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता. शेतकरी कामगार पक्षानेही पार्थ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात किती उमेदवार म्हणून आम्ही कुटुंबाने आणि पक्षाने चर्चा केली. शिवाय माझी राज्यसभा टर्म अजून शिल्लक आहे, कौटुंबीक चर्चेनंतर मी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

मी आतापर्यंत 14 निवडणुका जिंकल्या, एकही हरलो नाही, त्यामुळे चिंतेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं समजू नका, असं यावेळी शरद पवार म्हणाले. एकाच कुटुंबातील तिघे नको, म्हणून आपण निवडणुकीत माघार घेत आहोत. सुप्रिया सुळे बारामतीतून आणि पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवतील, असं पवारांनी नमूद केलं.

मी 14 निवडणूक जिंकल्या मात्र अजून अपयश नाही. निवडणुकीत सामोरं जाण्याची चिंता नाही. आता चिंता वाटण्याचे कारण नाही. आता तर कोणतीही लाट नाही. यंदा अनुकूल वातावरण आहे, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

लोकमान्यता आणि निवडून येण्याची क्षमता याचा निर्णय आम्ही करतो. त्यानुसार पार्थ पवारांना उमेदवारी देण्याचा विचार सर्वानुमते आहे, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र सद्यस्थिती पाहता शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत साशंक होते. माढ्यातील मतभेदामुळं शरद पवार अद्याप माढ्यातून निवडणूक लढण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत होतं. पवारांना दगाफटक्याची भीती होती, त्यामुळे पवारांनी एक-दोनदा नव्हे तर चौथ्यांदा माढा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. अखेर शरद पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली.

माढा लोकसभा मतदारसंघातून आता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. सध्या इथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनीच पवारांना माढ्यातून लढण्याची विनंती केली होती. त्यामुळे निवडणूक न लढण्याची घोषणा केलेल्या शरद पवारांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं लागलं होतं. मात्र आता पवारांनी पुन्हा निवडणुकीतून माघार घेतली.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

शरद पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद

संबंधित बातम्या

राज्याचं लक्ष लागलेले 10 मतदारसंघ आणि त्यांच्या निवडणुका

सोलापूर मतदारसंघात भाजपचे दोन खासदार विरुद्ध जयसिद्धेश्वर महास्वामी  

पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार  

शरद पवारांनी रणशिंग फुंकलं, स्वत:च्या मतदारसंघात पहिली बैठक  

महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.