AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांवरील टीकेने संतोष पंडित तुरुंगात, जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून सत्कार, चर्चांना उधाण

Ravindra dhangekar : चंद्रकांत पाटलांवरील टीकेमुळे संतोष पंडित याना तुरुंगात जावं लागलं होतं. आता जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रकांत पाटलांवरील टीकेने संतोष पंडित तुरुंगात, जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून सत्कार, चर्चांना उधाण
santosh pandit Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 9:36 AM
Share

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांची काही दिवसांपूर्वी जामीनावर सुटका झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या असंसदीय शब्दामुळे संतोष पंडित अडचणीत सापडले होते. संतोष पंडित यांना रात्री एक वाजता घरातून उचललं होतं. पोलिसांकडून रात्री अटक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वत:च्या कानावरही अनेक चापट मारल्या होत्या. त्यांच्या अटकेचे पडसाद देशभर उमटले होते. आता जामिनावर बाहेर आलेल्या संतोष पंडित यांचा सत्कार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

पुण्यात शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते, चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप अनेकदा पाहिले असतील. रवींद्र धंगेकर यांनी अनेकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गंभीर आरोपानंतर समीर पाटील यांनी मानहाणीचा दावा ठोकला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद सर्वश्रूत आहे. आता रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक कृतीतून मंत्री चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे.

माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी संतोष पंडित यांचा सत्कार केला आहे. संतोष पंडित यांना कार्यालयात बोलावून सत्कार केला. संतोष पंडित यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जामीन मंजूर झाल्यावर धंगेकर यांनी सत्कार केला आहे. यावेळी धंगेकर यांनी फेटा बांधत संतोष पंडित यांचा सत्कार केला. त्यांचा सत्काराचा व्हिडिओ सोशल व्हायरल होत आहे. दोघेही व्हिडिओमध्ये हसत हसत संवाद साधत आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती समोर आलेली नाही. काही इतर मंडळी देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यांच्या कार्यालयातच  हा सत्कार सोहळा झाला.

संतोष पंडित यांना 3 सप्टेंबरला झाली होती अटक

युट्युबर संतोष पंडित यांच्यावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह वक्तव्ये आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. यानंतर एका महिलेने संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणी संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री 1 वाजता अटक केली होती. त्यानंतर पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने तपासासाठी पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचे मुद्दे मांडले होते. तर सरकारी पक्षाने साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचे सांगत जामिनाला विरोध केला होता. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही