AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही, दादरमध्ये मोठी शोधाशोध

शिंदेंची शिवसेना मुंबईत नवीन 'सेनाभवन' उभारण्यासाठी जागा शोधत आहे. यासाठी वांद्रे बीकेसी आणि दादर या दोन जागांची पाहणी झाली आहे. कॉर्पोरेट बीकेसीऐवजी मराठी बाणा असलेल्या दादरला प्राधान्य दिले जात आहे. पक्षाचा विस्तार आणि मुंबईतील पकड मजबूत करण्यासाठी हे नवीन मुख्यालय महत्त्वाचे मानले जात आहे. लवकरच दादरमधील जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान... एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन... कलानगरच नाही, दादरमध्ये मोठी शोधाशोध
एकनाथ शिंदेंचा मोठा प्लान
| Edited By: | Updated on: Jun 23, 2026 | 9:23 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि काल त्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. खासदारांच्या या फुटीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला असतानाचा आता आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. मातोश्रीसमोर आणखी एक आव्हान उभं राहू शकतं. शिवसेना शिंदे गटाचा विस्तार होत असतानाच आता एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुंबईत आता शिंदेंच्या शिवसेनेचं नवीन “सेनाभवन” उभं राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन “सेनाभवना”साठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांची शोधाशोध सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुंबईत आणखी एक शिवसेना भवन उभं राहू शकतं. एकीकडे खासदारांची फूट,  कार्यकर्ते, पदाधिकारी याचं आऊटगोईंग सुरू असतानाचा आता सेनाभवनच्या रुपाने मातोश्रीसाठी, ठाकरे गटासाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं.

“सेनाभवना”साठी जागेची शोधाशोध सुरू

साधारण 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि अनेक आमदारांसह बाहेर पडत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. शिवसेना शिंदे गट निर्माण झाला अन् तेव्हापासून आत्तापर्यंत विविध पक्षांचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेना शिंदे गटात सामील झाले. शिवसेना शिंदेगटाकडून आता राज्यभरात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता पक्षासाठी “मुख्यालय” असणे गरजेचं आहे. यासाठी शिवसेना भवनाच्या धर्तीवर ,शिॅदेंच्या शिवसेनेकडून नव्या सेनाभवनासाठी जागांची पाहणी सुरू केली आहे.

त्यासाठी मुंबईतच दोन जागा पाहण्यात आल्या असून त्यातील ऐक जागा ही वांद्रे बीकेसीतील असून ही जागा ठाकरेंच्या ‘मातोश्री’हून अगदी काही अंतरावर असल्याचे समजते. तर दुसरी जागा ही दादरमध्ये पाहण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुठे होणार सेनाभवन ?

सेाभवनसाठी या दोन्ही जागांची पाहणी करण्यात आली आहे. मात्र शिवसेना हा मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन करण्यात आलेला पक्ष आहे. त्यामुळेच जिथे अनेक विविध कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालयं आहेत, अशी बीकेसीधून शिवसेनेचं कार्यालय चालवता येणार नाही. म्हणूनच दादरसारख्या मराठमोळ्या परिसरातच शिवसेना भवन असायला हवे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर दादरमधील जागेची चाचपणी करण्यात आली असून लवकरच ती निश्चित होईल असं कळतं. मात्र तिथेही काही त्रुटी असून त्यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यभरात एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने पक्षाचा विस्तार करत आहेत, ते पाहता मुंबईतही पक्षाचे हक्काचे कार्यालय असणे गरजेचे आहे. शिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळेच मुंबई हातात ठेवण्यासाठी शिंदेंकडून मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र त्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयही असणे गरजेचे असल्याने नव्या सेनाभवनासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर