नुसत्याच निष्ठेच्या मोठया बाता…रुपाली पाटील यांनी पुराव्यांसह अमोल कोल्हे यांना घेरले

| Updated on: Mar 27, 2024 | 1:41 PM

amol kolhe: रुपाली पाटील यांनी पोस्ट करताना म्हटले की, स्वकर्तुत्व? नुसत्याच निष्ठेच्या मोठया मोठया बाता. या दोन ओळीत उत्तर देताना रुपाली पाटील यांनी अमोल कोल्हे यांना आरसा दाखवला आहे. त्यांनी सर्व पक्षाच्या लोकांसोबत फोटो जोडले आहे.

नुसत्याच निष्ठेच्या मोठया बाता...रुपाली पाटील यांनी पुराव्यांसह अमोल कोल्हे यांना घेरले
Follow us on

पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवार आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणाऱ्या डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा निश्चय अजित पवार यांनी जाहीरपणे केला. त्यासाठी शिरुर मतदार संघात शिवसेनेत असलेले शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा मंगळवारी झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अमोल कोल्हे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले, शिवाजी आढळराव पाटलांना आपल्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे. गेल्या लोकसभेत तुम्ही माझ्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांना निवडून दिलं आहे. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी त्यांना बघून घेतो. त्या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले. ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या संघर्षाच्या काळात मी ठामपणे उभा आहे याला निष्ठा म्हणतात, असे ते म्हणाले. आता त्याला रुपाली पाटील यांनी सोशल मीडियातून उत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटलंय रुपाली पाटील यांनी

रुपाली पाटील यांनी पोस्ट करताना म्हटले की, स्वकर्तुत्व? नुसत्याच निष्ठेच्या मोठया मोठया बाता. या दोन ओळीत उत्तर देताना रुपाली पाटील यांनी अमोल कोल्हे यांना आरसा दाखवला आहे. त्यांनी सर्व पक्षाच्या लोकांसोबत फोटो जोडले आहे. पहिला फोटो राज ठाकरे यांच्याबरोबरचा आहे. त्यात म्हटले आहे की मनसेमधून राजकीय जीवनाला सुरुवात. त्यानंतर मनसेमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो जोडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याचा फोटो दिला आहे.

अशी बदलली निष्ठा

अमोल कोल्हे यांच्या निष्ठेचे उदाहरण देताना दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याचा फोटो दिला आहे. त्यावेळी अमोल कोल्हे भाजपात जाण्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिल्याचा फोटो दिला आहे. त्यानंतर अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्यासोबत असल्याचे फोटो दिला आहे. आज अमोल कोल्हे हे निष्ठेवरती गप्पा मारत असल्याचे रुपाली पाटील यांनी शेवटी म्हटले आहे.