शिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

अहमदनगर : अहमदनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि बसपाच्या मदतीने भाजपने आपला उमेदवार महापौरपदावर बसवला आहे. मात्र, या अभद्र युतीमुळे आणि इतर घडामोडींमुळे नगरमधील वातावरण तापू लागले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बरळणार श्रीपाद छिंदम याला थेटे शिवसेनेच्या उमेदवाराने मतासाठी फोन केल्याचा दावा श्रीपाद छिंदम याने केला आहे. छिंदम आणि बाळासाहेब बोराटे यांच्यातील ऑडिओ […]

शिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : अहमदनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि बसपाच्या मदतीने भाजपने आपला उमेदवार महापौरपदावर बसवला आहे. मात्र, या अभद्र युतीमुळे आणि इतर घडामोडींमुळे नगरमधील वातावरण तापू लागले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बरळणार श्रीपाद छिंदम याला थेटे शिवसेनेच्या उमेदवाराने मतासाठी फोन केल्याचा दावा श्रीपाद छिंदम याने केला आहे. छिंदम आणि बाळासाहेब बोराटे यांच्यातील ऑडिओ क्लिप स्वत: छिंदम यानेच व्हायरल केली आहे.

बाळासाहेब बोराटे हे अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदावर होते. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

श्रीपाद छिंदमने काय दावा केलाय?

“बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे कॉल रेकॉर्डिग आहे, असा खळबळजनक दावा करत असतानाच श्रीपाद छिंदम पुढे म्हणाला, “सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत.”

तसेच, ज्यांनी श्रीपाद छिंदमला मारहाण केली, त्यांच्याविरोधात छिंदम गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेकडून आपल्या जीवितास धोका असल्याचेही छिंदमने यावेळी सांगितले.

ऐका कॉल रेकॉर्डिंग :

बाळासाहेब बोराटे यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा करत, कोतवाली पोलिस ठाण्यात श्रीपाद छिंदम विरुद्ध तक्राj दाखल केली आहे.

शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपतून हकालपट्टी झालेल्या श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केलं. मात्र छिंदमने आपल्याला (शिवसेनेला) मतदान का केलं, या रागातून शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोप दिला. तसंच भाजपनेच छिंदमला आपल्याला मतदान करण्यास बजावल्याचा आरोप शिवसेनेने केला. मात्र जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी हा आरोप फेटाळला.

अभद्र युती

एकंदरीत अहमदनगरमध्ये सासरे शिवाजी कर्डिले यांची भाजप आणि जावई संग्राम जगताप यांची राष्ट्रवादी अशी अभद्र युती पाहायला मिळाली. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा सोयरे धायऱ्यांचं राजकारण सुरु झालं.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.