AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मर्सिडीजचं ‘ते’ वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी! मर्सिडीजचं 'ते' वक्तव्य नीलम गोऱ्हेंकडून मागे?
| Updated on: Mar 02, 2025 | 5:37 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं होतं, आता त्यांनी आपलं हे वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता, त्यांना पक्षाकडून नोटीस बजवण्यात आली होती, या नोटीसीनंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, या संमेलनातील एका सत्रात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लगत होत्या, असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावरून राजकारण चांगलंच तापलं. शिवसेना ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता.  खासदार संजय राऊत यांनी तर थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या वक्तव्याप्रकरणात निलम गोऱ्हे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीनंतर आता नीलम गोऱ्हे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे, त्यांनी या प्रकरणात दिलगिरी देखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुढची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊत यांचं उषा तांबेंना पत्र

दरम्यान गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी.’ असं राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.