AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार?

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 7:18 PM
Share

राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून 13 झाली आहे, तर आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार आहेत.

दरम्यान 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता काँग्रेसकडे 14 खासदार आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट होता, शिवसेना ठाकरे गटाचे 2024 च्या निवडणुकीमध्ये 9 खासदार निवडून आले होते, परंतु यातील आता 6 खासदार फुटल्याने त्यांच्याकडे आता केवळ तीनच खासदार राहिले आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार होते, मात्र सहा बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या ही 13 वर पोहोचली आहे. तर भाजपकडे सध्या राज्यात 9 खासदार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक खासदार आहे. याचाच अर्थ आता महायुतीमध्ये राज्यात शिवसेना शिंदे गट नंबर एकचा पक्ष बनला आहे. त्यांच्याकडील खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर राज्यात खासदारांच्या संख्येमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष असून त्यांच्याकडे 14 खासदार आहेत.

आज या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. सहाचे सहा खासदार हे पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील. धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून देखील येतील. शिवसेनेत हे सर्वजण सामील झाले आहेत. स्वखुशीने हा यातील सर्वात मोठा भाग आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!