मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती, 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर पोहोचले आहेत.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग
शिवसेना शिंदे गटाचे नेते फडणवीसांच्या भेटीला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 10:25 PM

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6  खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण 9 खासदार होते, त्यापैकी 6 खासदार फुटल्याने आता उद्धव शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार राहिले आहेत. मात्र दुसरीकडे 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीपूर्वी 7 खासदार होते, मात्र त्यानंतर आता या सहा खासदारांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

एकीकडे या सर्व सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि  शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले असून, घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी जेव्हा बंडखोरी केली होती,  त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यातमळ्यात होती. मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईल असं त्यांनी म्हटलं होतं. ओमराजे यांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगर संकटात सापडलं होतं, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर सोपवली होती, तानाजी सावंत यांना ओमराजे यांचं मन वळवण्यात यश आलं, त्यानंतर ओमराजे यांनी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान त्यानंतर आता ओमराजे आणि तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्यासोबत वकील निलेश देशमुख हे देखील वर्षावर दाखल झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us